• Home
 • »
 • News
 • »
 • auto-and-tech
 • »
 • Volvo XC60 SUV आणि S90 सेडान भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

Volvo XC60 SUV आणि S90 सेडान भारतात लाँच, पाहा किंमत आणि फीचर्स

स्वीडनची प्रमुख वाहन निर्माता कंपनी Volvo ने भारतीय बाजारात आपले दोन मॉडेल अपडेट करत XC60 SUV आणि S90 सेडान लाँच केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 20 ऑक्टोबर : स्वीडनची प्रमुख वाहन निर्माता कंपनी Volvo ने भारतीय बाजारात आपले दोन मॉडेल अपडेट करत XC60 SUV आणि S90 सेडान लाँच केली आहे. S90 सेडानमध्ये कंपनीने माइल्ड-हायब्रिड सिस्टमचा वापर केला आहे. तर XC60 SUV मध्ये काही खास फीचर्स देण्यात आले आहेत. Volvo XC60 SUV - या कारसाठी पायलट एसिस्टम फंक्शन सामिल करण्यात आलं आहे. त्याशिवाय यात अँड्रॉईड पावर्ड टचस्क्रिन इन्फोटेनमेंट सिस्टम अपडेट केलं आहे. हे सिस्टम बिल्ट-इन गुगल आणि व्हॉईस असिस्टेंटसाख्या डिजीटल सर्विसेसने युक्त आहे. या SUV मध्ये 2.0 लीटर क्षमतेचं 4 सिलेंडरयुक्त पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे, जे 48-v माइल्ड हाइब्रिड इलेक्ट्रिक मोटरसह येतं. हे इंजिन 247 bhp च्या दमदार पॉवर आणि 350 nm टॉर्क जनरेट करतं. कंपनीने या इंजिनमध्ये 8 स्पीड गियरबॉक्स दिले आहेत.

  सावधान! गाडीचं स्टेअरिंग फेल होण्याआधी मिळतात हे 5 संकेत,या गोष्टींकडे लक्ष द्या

  Volvo S90 - Volvo S90 पेट्रोल माइल्ड-हाइब्रिड मॉडेलमध्येही XC60 सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. यात फ्रंट ग्रिल, ब्रँडचा नवा लोगो, मागे बंपर क्रोम लाइन, नवं अलॉय व्हिल, नव्या बॉडी कलरसह अपडेट्स देण्यात आले आहेत. कंपनीने यात 2.0 क्षमतेचं 4 सिलेंडरयुक्त इंजिनचा वापर केला आहे, जो 48-वोल्ट माइल्ड हाइब्रिड इलेक्ट्रिक मोटरसह येतो. हे इंजिन 247 bhp पॉवर आणि 350 nm टॉर्क जनरेट करतं. हे इंजिनही 8 स्पीड गियरबॉक्ससह येतं.

  Transformers सारखी कार आता रस्त्यावर धावणार, असे आहे फिचर्स

  कंपनीने या दोन्ही मॉडेलला 3 वर्षांची वॉरंटी आणि सर्विस स्किम दिली आहे. त्यासाठी ग्राहकांना 75,000 रुये वेगळे द्यावे लागतील. या दोन्ही गाड्यांची सुरुवातीची किंमत 61.90 लाख रुपये एक्स-शोरुम आहे.
  Published by:Karishma
  First published: