मालगाव, 10 नोव्हेंबर: सांगली (Sangli) जिल्ह्यातील मालगाव याठिकाणी एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे. कंपनीने पाठवलेल्या चुकीच्या औषधाची फवारणी (sprayed wrong medicine on grapes) केल्यामुळे 20 शेतकऱ्यांची तब्बल 25 एकरावरील दाक्षे बाग नष्ट झाली आहे. त्यामुळे संबंधित शेतकऱ्यांचं तब्बल अडीच कोटी रुपयांचं नुकसान (Lost 2.5 Crore) झालं आहे. हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर, नुकसानीची जबाबदारी घेण्यास कंपनीनं टाळाटाळ केली आहे. त्यामुळे पीडित शेतकऱ्यांनी कृषी केंद्रचालक आणि कंपनीविरोधात पोलिसांत धाव घेतली आहे.
याप्रकरणी पोलिसांन संबंधितांवर गुन्हा दाखल केला असून घटनेच्या तपासाला सुरुवात केली आहे. दरम्यान, कृषी विभागाने पंचनामे करून करून नुकसानीस कारणीभूत ठरलेल्या औषधाचे नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. दुसरीकडे, कंपनीनं नुकसानीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केल्याने दोन शेतकऱ्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
हेही वाचा-लाचखोर महिला अभियंता अडकली जाळ्यात; घरीच लाच घेताना रंगेहाथ अटक
सांगली जिल्ह्यातील मालगाव येथील काही शेतकऱ्यांनी आपल्या द्राक्ष बागेवरील रोग नियंत्रण करण्यासाठी गावातील एका कृषी औषध विक्री दुकानातून रोडोमिल 35 टक्के मैटसैक नावाचं औषध खरेदी केलं होतं. मालगाव परिसरात वीस शेतकऱ्यांनी संबंधित औषधाची आपल्या द्राक्षेच्या बागेवर फवारणी केली होती. तीन दिवसांत या औषधाची रोगप्रतिबंधक मात्रा लागू होण्याऐवजी द्राक्ष बागेवर त्याचे दुष्परिणाम दिसू लागले.
हेही वाचा-क्रूरतेचा कळस! सळईने मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू,पुण्यातील मन हेलावणारी घटना
बागेतील पानं पिवळी पडून द्राक्षेचे घडही गळून पडू लागले. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी कंपनीकडे नुकसान भरपाई देण्याची मागणी केली, पण कंपनी नुकसानीची जबाबदारी घेण्यास टाळाटाळ केली आहे. याप्रकरणी मालगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Sangli