• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • लाचखोर महिला अभियंता अडकली जाळ्यात; घरीच लाच घेताना रंगेहाथ अटक

लाचखोर महिला अभियंता अडकली जाळ्यात; घरीच लाच घेताना रंगेहाथ अटक

लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून एका लाचखोर महिला उप अभियंत्याला रंगेहाथ अटक केली आहे. पोलिसांनी लाचेची रक्कम जप्त केली असून पुढील चौकशी केली जात आहे.

 • Share this:
  इंदूर, 10 नोव्हेंबर: सध्या देशभरातून लाचखोरीच्या अनेक घटना (Bribe cases) समोर येत आहे. ज्यामध्ये महिलाही मागे राहिल्या नाहीत. अलीकडेच अशी अनेक प्रकरणं समोर आली आहेत, ज्यात एसीबी (ACB) किंवा लोकायुक्त पोलिसांनी महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना लाच घेताना पकडलं आहे. यानंतर आता आणखी एका लाचखोर महिला उप अभियंत्याला रंगेहाथ पकडण्यात (Woman engineer caught red handed) आलं आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी अटक (woman arrested) केली असून घटनेचा तपास केला जात आहे. संबंधित अटक केलेल्या लाचखोर महिलेचं नाव गीता विजयवर्गीय असून त्या जनपद पंचायतीत उपअभियंता म्हणून कार्यरत आहेत. आरोपी विजयवर्गीय यांना पाच हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. एका भूखंडावरील घराचा नकाशा पास करण्यासाठी लाच मागितल्याचा आरोप गीता विजयवर्गीय यांच्यावर आहे. याबाबत तक्रार मिळताच लोकायुक्त पोलिसांनी सापळा रचून महिला अभियंत्याला तिच्याच घरात लाच घेताना रंगेहाथ पकडलं आहे. संबंधित प्रकरण मध्य प्रदेशची राजधानी इंदूर येथील आहे. हेही वाचा-लग्न जुळत नसल्यानं आलं नैराश्य; परभणीत 23 वर्षीय युवकाने उचललं धक्कादायक पाऊल इंदूर येथील रहिवासी असणारे अशोक शर्मा यांना त्यांच्या प्लॉटवर घर बांधायचं होतं. यासाठी त्यांना जनपद पंचायतीकडून नकाशा मंजूर करून घ्यायचा होता. नकाशा मंजूर करून घेण्यासाठी शर्मा यांनी जनपद पंचायतीत रीतसर अर्ज केला होता. पण संबंधित नकाशा मंजूर करण्यासाठी जनपद पंचायतीतील उप अभियंता गीता विजयवर्गीय यांनी लाच मागितली होती. त्याचबरोबर पैसे घेतल्याशिवाय नकाशा पास करणार नाही, असंही त्यांनी म्हटल्याचं आरोपांत म्हटलं आहे. हेही वाचा-रिक्षा चोरी करून बदलायचे नंबर प्लेट; मग यासाठी करायचे वापर, मुंबईतील टोळीला अटक पण तक्रारदाराने लाच देण्याऐवजी थेट लोकायुक्त पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली. तसेच दोघांमधील झालेल्या संभाषणाचं रेकॉर्डिंगही लोकायुक्त पोलिसांकडे सादर करण्यात आलं. यानंतर पोलिसांनी सापळा रचून महिला उप अभियंत्याला अटक केली आहे. पोलिसांनी लाच घेऊन अशोक शर्मा याला महिलेच्या घरी पाठवलं होतं. याठिकाणी आरोपी गीता विजयवर्गीय यांनी पाच हजार रुपयांची लाच स्विकारताच लोकायुक्तांच्या पथकानं घटनास्थळी छापा टाकत महिलेला अटक केली आहे. तसेच त्यांच्याकडून लाचेची रक्कम जप्त केली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास केला जात आहे.
  Published by:News18 Desk
  First published: