मराठी बातम्या /बातम्या /पुणे /क्रूरतेचा कळस! सळईने मारहाण केल्याने भटक्या श्वानाचा मृत्यू, पुण्यातील मन हेलावणारी घटना

क्रूरतेचा कळस! सळईने मारहाण केल्याने भटक्या श्वानाचा मृत्यू, पुण्यातील मन हेलावणारी घटना

(File photo)

(File photo)

Crime in Pune: पुण्यातील दत्तवाडी परिसरात क्रूरतेच्या परिसीमा गाठवणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका विकृताने भटक्या कुत्र्याला भयंकर मृत्यू दिला आहे.

पुणे, 10 नोव्हेंबर: पुण्यातील (Pune) दत्तवाडी परिसरात क्रूरतेच्या परिसीमा गाठवणारी घटना उघडकीस आली आहे. येथील एका विकृत तरुणाने कोणतंही कारण नसताना, एका भटक्या श्वानाला लोखंडी सळईने बेदम मारहाण (Stray dog died after beating with iron rod) केली आहे. डोक्यात जबरी घाव घातल्यामुळे संबंधित कुत्र्याचा जागीच मृत्यू झाला आहे. याप्रकरणी एका स्थानिक महिलेनं दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. दत्तवाडी  पोलिसांनी अ‍ॅनिमल अ‍ॅक्टनुसार आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

अमोल खेडकर असं गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचं नाव असून तो दत्तवाडी परिसरातील रहिवासी आहे. याप्रकरणी भारती अशोक साळुंखे (वय-52) यांनी दत्तवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून दत्तवाडी पोलिसांनी आरोपी खेडकर याच्या विरोधात प्राण्यांना क्रूरतेनं वागणूक दिल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.

हेही वाचा-रिक्षा चोरी करून बदलायचे नंबर प्लेट; मग यासाठी करायचे वापर, मुंबईतील टोळीला अटक

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांच्या घराच्या परिसरात गेल्या दहा वर्षांपासून राणी नावाचं श्वान राहात होतं. फिर्यादी स्वत: आणि आसपासचे लोकं या श्वानाला खायला टाकत होते. त्यामुळे हे श्वान याठिकाणी गेल्या दहा वर्षांपासून वास्तव्याला होते. दरम्यान, 8 नोव्हेंबर रोजी सकाळी फिर्यादी आपल्या घरासमोर उभे होते. यावेळी रस्त्यावरून फिरणाऱ्या या श्वानाला आरोपी खेडकर याने विनाकरण डोक्यात सळईने मारहाण केली.

हेही वाचा-लग्न जुळत नसल्यानं आलं नैराश्य; परभणीत 23 वर्षीय युवकाने उचललं धक्कादायक पाऊल

ही मारहाण इतकी भयंकर होती, की फिर्यादीच्या डोळ्यादेखत श्वानाने प्राण सोडला आहे. कोणतंही कारण नसताना केवळ आसुरी आनंद मिळवण्यासाठी आरोपीनं मुक्या प्राण्याला मारहाण केली आहे. या घटना समोर येताच, परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Crime news, Pune