औरंगाबाद, 08 जून : औरंगाबादमध्ये कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. शहरातील हर्सूल कारागृहातील 29 कोरोना पॉझिटिव्ह कैद्यावर किल्ले आर्क कोविड सेंटरमध्ये उपचार सुरू होते. पण, यातील 2 पॉझिटिव्ह कैदी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली. कोविड सेंटरच्या काचेची खिडकीची काच फोडून गजाला बेड शीट बांधून त्यांनी पोबारा केला. जेल प्रशासनाकडून बेगमपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. कोरोना पॉझिटिव्ह कैद्यांचा शोध सुरू आहे. **हेही वाचा -** भयंकर! मेडिकलला लागलेल्या आगीत डॉक्टरचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी अक्रम खान गयास खान आणि सय्यद कैफ सय्यद असद अशी कैद्याची नाव आहे. रात्री कैदी पळून जात असताना काही लोकांनी त्यांना अडवलं आणि विचारलं देखील. मात्र, ‘आम्हाला लोकं मारत आहेत म्हणून आम्ही पळत आहोत’, असं उत्तर त्यांनी दिलं. तरीही संशय आल्याने स्थानिक तरुणांनी ही बाब बेगमपुरा पोलिसांना कळवली होती. मात्र, पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केलं. **हेही वाचा -** पोलीस दलातून आली कोरोनाची धक्कादायक बातमी, नवी आकडेवारी समोर कारागृह अधिकारी हिरालाल जाधव यांनी या प्रकरणी आता पोलिसांकडे तक्रार दिली आहे. कोरोना पॉझिटिव्ह कैदी असल्याने ते इतरांना बाधित करू शकतात म्हणून पोलीस त्यांचा कसून तपास करीत आहेत. संपादन - सचिन साळवे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.