मुंबई, 08 जून : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे . राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त आणि नाकेबंदीमुळे पोलीस कर्मचारी 24 तास रस्त्यावर आहेत. यामुळेच या विषाणूंचा प्रादुर्भाव पोलीस विभागात देखील मोठ्या प्रमाणात दिसू लागला आहे.
राज्यात तब्बल दीड हजाराच्या आसपास पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना या विषाणूची लागण झाली असून त्यांच्यावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत अशी माहिती गृह खात्याच्या वतीने देण्यात आली आहे.
हेही वाचा -पुण्यात नव्या आदेशानुसार हे राहणार सुरू आणि बंद ; संपूर्ण यादी
या विषाणूंचा प्रभावामुळे मुंबईत 20 पोलीस कर्मचारी आणि एक वरिष्ठ अधिकारी अशा 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर पुणे २, सोलापूर शहर 2, नाशिक ग्रामीण 3, ए.टी.एस. 1, मुंबई रेल्वे 1, ठाणे ग्रामीण 2, जळगाव ग्रामीण 1 अशा 34 पोलीस वीरांना आपला जीव गमवावा लागला.
सध्या 196 पोलीस अधिकारी तर 1241 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी उपचार सुरू आहेत. पोलिसांना जर कोरोना संदर्भातील काही लक्षणे दिसून आली तर त्यांच्यावर तातडीने उपचार व्हावेत, याकरिता राज्यात सर्वत्र नियंत्रण कक्ष स्थापन केले आहेत.
हेही वाचा -अभिनेता चिरंजीवी सरजा यांचं 2 वर्षांपूर्वीच झालं होतं लग्न, पत्नी आहे प्रेग्नन्ट
अत्यावश्यक सेवेसाठी 4 लाख 60 हजार पास वाटप केले असून 5 लाख 86 हजार व्यक्ती क्वारंटाइन असून 6 कोटी 78 लाखांचा दंड वसुली करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या 1332 वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व 80,532 वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे 15 गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.