Home /News /maharashtra /

भयंकर! मेडिकलला लागलेल्या आगीत डॉक्टरचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

भयंकर! मेडिकलला लागलेल्या आगीत डॉक्टरचा होरपळून मृत्यू, एक जण गंभीर जखमी

आग लागल्यानंतर मेडिकलमध्ये असलेल्या सॅनिटायझर आणि फ्रिजचा स्फोट झाला.

बीड, 8 जून : गेवराई तालुक्यातील बागपिंपळगाव कॅम्प येथील मेडिकलला आग लागून स्फोट झाल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री घडली असून या स्फोटात डॉक्टरचा होरपळून मृत्यू झाला आहे. तसंच या दुर्घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. डॉ.सुधाकर भाऊसाहेब चोरमले असं मयत व्यक्तीचे नाव आहे. कॅम्प परिसरातील मेडकलली अचानक आग लागली आणि त्यानंतर स्फोट झाला. आग लागल्यानंतर मेडिकलमध्ये असलेल्या सॅनिटायझर आणि फ्रिजचा स्फोट झाला. हा स्फोट इतका भयंकर होता की मेडिकलचे शटर रस्त्यावर येऊन पडले. मात्र या आगीचं कारण अद्याप समजू शकलं नाही. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर डॉक्टर व त्यांच्या सहकाऱ्याला जखमी अवस्थेत बीड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान डॉक्टरचा मृत्यू झाला, तर अन्य एक सहकारी गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बीडमध्ये आणखी एक दुर्घटना कपडे धुण्यासाठी गेलेल्या एकाच घरातील तीन मुलांचा बुडून मृत्यू झाल्याची ह्रदयद्रावक घटना परळी तालुक्यातील शिवारात घडली. या घटनेनं कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परळी तालुक्यातील दाऊतपूर औष्णिक विद्युत केंद्राजवळ खदानीत पाणी साठलेले आहे. आज सकाळी 8 वाजेच्या सुमारास कपडे धुण्यासाठी याच परिसरात दगडफोड करणाऱ्या मजूर कुटुंबातील एक 15 वर्षीय मुलगी खदानीमध्ये गेली होती. यावेळी तिच्यासोबत लहान बहीण व भाऊही होता. हेही वाचा - धरणाजवळील ओव्हर ब्रिजची भिंत कोसळली, 2 जणांचा दबून मृत्यू; घटना CCTV मध्ये कैद बराच वेळ झाल्यामुळे मुलं परत न आल्यामुळे कुटुंबातील काही सदस्यांनी खदानीमध्ये जाऊन पाहिले असता तिघे जण पाण्यात बुडाल्याचे आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. कुटुंबातील सदस्यांनी जीवाच्या आकांताने खदानीकडे धाव घेतली आणि तिन्ही लेकरांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. मुले पाण्यात बुडून मृत्यू पावल्याने परिसरात कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास करत आहे.
Published by:Akshay Shitole
First published:

पुढील बातम्या