• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • भिवंडी हादरली, एकाच दिवशी 2 मुलांचा खून, 8 वर्षांचा सत्यमचा सोसायटीतच सापडला मृतदेह

भिवंडी हादरली, एकाच दिवशी 2 मुलांचा खून, 8 वर्षांचा सत्यमचा सोसायटीतच सापडला मृतदेह

एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलांचा खून (murder) झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

  • Share this:
भिवंडी, 15 जुलै :  भिवंडीमध्ये (bhiwandi) गुन्हेगारी घटनांचे सत्र सुरूच आहे. आज एकाच दिवशी दोन अल्पवयीन मुलांचा खून (murder) झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बेपत्ता असलेल्या एका 8 वर्षीय मुलाची गळा आवळून हत्या केल्याची घटना कारिवली गावात घडली आहे. तर दुसऱ्या एका घटनेत 14 वर्षीय मित्राला दोघा मित्रांनी भेटण्याच्या बहाण्याने एका इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये नेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढण्याचा प्रयत्न केला असता त्याने विरोध केल्याने त्या दोघांनी त्याची गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पहिल्या घटनेत भिवंडी तालुक्यातील कारिवरी गावच्या हद्दीतील जेव्हीसी कॉम्प्लेक्स या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर  राहणारे नंदकुमार मधेशिया यांचा 8 वर्षाचा मुलगा सत्यम मधेशिया हा बुधवारी दुपारपासून बेपत्ता होता. त्यामुळे भोईवाडा पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी शोधकार्य सुरू केले होते. BMC चा मोठा निर्णय, तूर्तास ऑनलाईन विवाह नोंदणी बंद आज पहाटेच्या सुमारास सत्यम याचा गळा आवळून हत्या केल्याच्या अवस्थेत मृतदेह त्याच इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील रूममध्ये आढळून आला. भोईवाडा पोलिसांनी पंचनामा करून अज्ञात आरोपीच्या विरोधात हत्या आणि अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे. तर या प्रकरणी एकाला ताब्यात घेतल्याचे समजते. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. कोरोनातही IT कंपन्या जोमात; Infosys आणि TCS नंतर Wipro ही खेळतेय पैशांमध्ये तर दुसऱ्या घटनेत  14 वर्षीय मित्राला दोघा मित्रांनी बहाण्याने एका इमारतीच्या बंद फ्लॅटमध्ये नेले. त्यांनतर त्याच्या गळ्यातील सोनसाखळी काढण्याचा प्रयत्न केला असता, त्याने विरोध केल्याने त्या दोघांनी त्याची गळा आवळून हत्या केली. सोहम गजबे असं मृतक अल्पवयीन मुलाचे नाव आहे. तर अक्षय वाघमारे (24)  असं आरोपीचे नावे आहेत. धक्कादायक बाब म्हणजे, हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह त्याच बंद फ्लॅटमधील एका सोफ्यामध्ये लपवून ठेवला होता. याप्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपी मित्रांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
Published by:sachin Salve
First published: