मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

कोरोनातही IT कंपन्या जोमात; Infosys आणि TCS नंतर Wipro ही खेळतेय पैशांमध्ये; पुढील वर्षी बंपर भरती

कोरोनातही IT कंपन्या जोमात; Infosys आणि TCS नंतर Wipro ही खेळतेय पैशांमध्ये; पुढील वर्षी बंपर भरती

पुढील वर्षी या कंपन्यांमध्ये नोकरीची त्सुनामी येणारी की काय अशी स्थिती आहे.

पुढील वर्षी या कंपन्यांमध्ये नोकरीची त्सुनामी येणारी की काय अशी स्थिती आहे.

पुढील वर्षी या कंपन्यांमध्ये नोकरीची त्सुनामी येणारी की काय अशी स्थिती आहे.

    मुंबई, 15 जुलै: कोरोनामुळे (Corona) जगातील लोकांच्या आरोग्याचं नुकसान तर झालंच पण त्यासोबतच आर्थिक नुकसानही (Financial loss) झालं आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. अनेकांना त्यामुळे आपल्या नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. काही कंपन्यांना तर टाळं ठोकण्याची वेळ आहे. मात्र अशा कठीण परिस्थितीही अशा काही कंपन्या आहे ज्या हजारो कोटी कमवतात (companies with highest growth rate) आहेत. Infosys, TCS सारख्या IT कंपन्यांनी कोरोना काळात कोट्यवधी रुपये कमावले आहेत. यात आता Wipro कंपनीही मागे नाहीये. त्यामुळे पुढील वर्षी या कंपन्यांमध्ये नोकरीची त्सुनामी येणारी की काय अशी स्थिती आहे. नक्कीच यामुळे तरुण वर्गाला (Freshers jobs in IT sector) फायदा होणार आहे. देशातील तीन मोठ्या आयटी कंपन्यांनी त्यांचा पहिला तिमाही (एप्रिल-जून) कॉर्पोरेट फायदा (Corporate growth of company) जाहीर केला आहे. टीसीएस (TCS), इन्फोसिस (Infosys) आणि विप्रो (Wipro) यांचा मिळून तब्बल 17,446 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. म्हणूनच आता या कंपन्यांनी मार्च 2021 ते एप्रिल 2022 या चालू आर्थिक वर्षात 1 लाख 5 हजार फ्रेशर्सना नोकरी (Freshers jobs in IT sector) देण्याचं आश्वासन दिलं आहे. कोणत्या कंपनीला किती नफा जूनमधील तिमाहीत या उद्योगातील सर्वात मोठी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसनं (TCS) तब्बल 9 हजार कोटींचा नफा मिळवला आहे.  तर त्या पाठोपाठ इन्फोसिसनं (Infosys) 5,195 कोटी रुपये नफा मिळवला आहे. जो कंपनीच्या गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा नफा आहे. त्यानंतर  विप्रोनं (Wipro) नफा जाहीर केला आहे. कंपनीला गेल्या 10 वर्षातील सर्वात मोठा म्हणजेच 3,243 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. हे वाचा - रस्त्यावर झाडू मारणाऱ्या महिलेची जिद्द! पूर्ण करून दाखवलं अधिकारी व्हायचं स्पप्न वर्क फ्रॉम होम ठरलं फायदेशीर कोरोना महामारीमुळे कॉर्पोरेट्समध्ये घरगुती आणि ऑनलाइन शिक्षणामुळे आयटी कंपन्यांच्या व्यवसाय वाढीला मोठा फायदा झाला आहे. परिणामी कंपन्यांना मोठे कॉन्ट्रॅक्ट (Contracts) मिळाले आहेत. इन्फोसिसला जून तिमाहीत 19,381 कोटी आणि टीसीएसला 60,381 कोटी रुपयांचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. याशिवाय विप्रोला 5,325 कोटी रुपयांचे 8 नवीन कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. रोजगार उपलब्ध होणार IT कंपन्यांना वर्क फ्रॉम होम (Work from Home) आणि कोरोना या दोन्हीचा फायदाच झालेला दिसून येत आहे. त्यामुळे या कंपन्यांना अनेक मोठे कॉन्ट्रॅक्ट मिळाले आहेत. त्यासाठी या कंपन्या मोठ्या प्रमाणावर पदभरती करणार आहेत. TCS नं 40 हजार जागा तर Infosys नं 35 हजार जागा भरण्याचं निश्चित केलं आहे. तर आता Wipro ही लवकरच रोजगाराच्या संधी उपल्बध करणार आहे अशी माहिती मिळाली आहे.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Jobs

    पुढील बातम्या