यवतमाळ 10 सप्टेंबर : जिल्ह्याच्या आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या महागाव येथे गणपती विसर्जन करायला गेलेल्या दोन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेने खळबळ उडाली असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. गोकुळ दत्ता टेटर आणि सोपान बबनराव गावंडे अशी मृत मुलांची नावं आहेत. अपहरण केलं अन् बेशुद्ध करण्यासाठी केला अतिप्रमाणात क्लोरोफॉर्मचा वापर, 8 वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू घरगुती गणपती विसर्जन करण्यासाठी दोघेजण आपल्या मित्रांसह नाल्यावर गेले होते. गणपती विसर्जनही करण्यात आलं. त्यानंतर ते घरी परतले. गणपती पाण्यात बुडाला की नाही हे पाहण्यासाठी हे दोघे परत नाल्यावर गेले. मात्र, यावेळी हे दोन्ही मित्र नाल्यात बुडाले. दोघे नाल्यात बुडाल्याचं समजताच त्यांना तात्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. गणपती विसर्जनादरम्यान नाल्यात बुडालेल्या दोन्ही मुलांना तात्काळ बाहेर काढून आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांना 20 मिनिटं त्यांना बघितलंच नाही, असा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मोठी बातमी! पनवेलमध्ये गणेश विसर्जनादरम्यान 11 जणांना विजेचा झटका, अनेकांची प्रकृती चिंताजनक रुग्णालयात दाखल केल्यानंतर बराच वेळ डॉक्टरांनी त्यांना पाहिलं नाही, तसंच ऑक्सीजन लावलं नाही. डॉक्टरांच्या हलर्जीपणामुळे आमच्या मुलांचे मृत्यू झाल्याचा गंभीर आरोपी मृतकांचे नातेवाईक करीत आहेत. त्यामुळे आर्णी ग्रामीण रुग्णालयात काही वेळासाठी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.