पनवेल, 9 सप्टेंबर : ठाण्यात कोलबाड या सार्वजनिक गणेश मंडळाची शेवटी आरती सुरू होती. त्यावेळी तुफान पाऊस सुरू होता. यादरम्यान झाड पडल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला असून चौघेजण गंभीर जखमी असल्याचं वृत्त समोर आलं आहे. दरम्यान पनवेलमधूनही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पनवेलमध्ये वडघर खाडीत गणेश विसर्जन करताना 11 जणांना विजेचा शॉक लागला आहे. सर्वांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पनवेलमधील लाईफ लाईन आणि उप जिल्हा रुग्णालयात या जणांना दाखल करण्यात आलं आहे. विसर्जन करताना समोरील विद्युत पोलाची वायर तुटल्याने शॉक लागल्याची माहिती समोर आली आहे. ठाण्यातून मोठी बातमी, बाप्पाची शेवटची आरती अन्..एका महिलेचा दुर्देवी मृत्यू, दोघे गंभीर यातील जखमींमध्ये एक 9 आणि 5 वर्षांच्या लहानग्या मुलींचाही समावेश आहे. यातील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. सर्वांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. बातमी अपडेट होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.