उल्हासनगर, 11 सप्टेंबर : मुंबईत साकिनाका बलात्कार (Mumbai Sakinaka rape case) आणि हत्या प्रकरण ताजे असताना उल्हासनगरमध्ये (Ulhasnagar ) एका 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. उल्हासनगर रेल्वे स्टेशन (Ulhasnagar railway station) परिसरात ही धक्कादायक घटना घडली आहे. रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या पडक्या घरात एका चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार ( minor girl rape,) करण्यात आला. कल्याण रेल्वे पोलिसांनी बलात्कार करणाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला आहे. आरोपीचे नाव श्रीकांत गायकवाड असल्याची माहिती समोर येते आहे. बॉलिवूड रोजंदार कामगारांना यशराजकडून मदतीचा हात; असा करा अर्ज पीडित मुलगी ही शिर्डीहून कल्याण येथे खाजगी बसने आली होती. त्यानंतर कल्याण रेल्वे स्थानकातून तिने उल्हासनगर स्टेशन गाठलं. त्यानंतर उल्हासनगर स्कायवॉक वर तिला तिचे दोन मित्र भेटले. त्यांच्याशी बोलत असताना समोरून आलेल्या आरोपींना हातात हातोडा असल्यानं त्याने या मुलीच्या मित्रांना धमकावलं. त्यामुळे तिचे मित्र पळून गेले. यानंतर आरोपीने या मुलीला स्टेशन परिसरात असलेल्या एका पडक्या घरात नेत तिच्यावर बलात्कार केला. दरम्यान, पहाटेपर्यंत ही मुलगी त्या पडक्या घरात होती. त्यानंतर तिने आपल्या मित्राला फोन करून आपल्यावर बलात्कार झाल्याची माहिती दिली. वर्षभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, घरातून 21 तोळे सोन्याचे दागिने चोरले! दरम्यान, या संदर्भात कल्याण रेल्वे पोलिसात पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर आज कल्याण रेल्वे पोलिसांनी आरोपीला अटक केली. आरोपीचे नाव श्रीकांत गायकवाड असल्याची माहिती समोर येते आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







