जालना, 26 डिसेंबर : जुन्या भांडणाच्या रागातून एका दलित तरुणाचं (dalit youth murder in jalana) अपहरण करून निर्घृणपणे खून (murder) केल्याची खळबळजनक घटना जालन्यात (jalana) घडली आहे. धक्कादायक म्हणजे, आरोपींनी मृत तरुणाने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी प्रेत झाडाला लटकावले होते. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जालना जिल्ह्यातील हिवरा रोशनगाव येथील खंडेवाडी तांडा इथं ही घटना घडली आहे. अनिल रघुनाथ थोरात (वय 29) असं या मृत तरुणाचे नाव आहे. अनिल थोरात हा रात्री 8.30 वाजेच्या सुमारास मोटारसायकलवरून घराकडे जात होता. त्यादरम्यान, गावातील संशयित आरोपी प्रभाकर पवार, संदीप राठोड, अंजू राठोड, दिलीप राठोड, रवि राठोड या पाच जणांनी संगणमत करून अनिल थोरात यास मारहाण केली आणि त्याला कारमध्ये बसवून घेऊन गेले होते. त्यांनतर अनिल याचा निर्घृण खून करण्यात आला. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी व अनिल याने आत्महत्या केल्याचे भासविण्यासाठी त्याचे हातवन शिवारातील वनविभागाच्या तळ्यात एका झाडाला गळफास लावून लटकावल. आज हा प्रकार लक्षात आल्यानंतर मौजपुरी पोलिसांना माहिती देण्यात आली. परतूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी राजू मोरे, सपोनि. विलास मोरे यांनी तातडीने घटनास्थळी भेट दिली आहे. (हेही वाचा - IND vs SA : द्रविड सीनियर खेळाडूंना बाहेर करण्याच्या तयारीत, कोणाला बसणार धक्का? ) मृत अनिल थोरात आणि त्याचे कुटुंबीय मजुरी करून उदरनिर्वाह करतात. अनिल आणि त्याचा भाऊ भारत हे दोघे एका हॉटेलमध्ये कामाला होते. अनिलचा भाऊ सुनील थोरात याने फिर्याद दिली की, 23 डिसेंबर रोजी त्याच्या बहिणीला पाहण्यासाठी घरी पाहुणे आले होते. त्यावेळी दुपारच्या सुमारास आरोपी राजू राठोड हा दारू पिऊन घरी आला आणि तुमच्या घरी इतके पाहुणे कशाला आले असं म्हणत मृत वडिलांना शिवीगाळ केली होती. परंतु, गावचे पोलीस पाटील जीवन मालेगावकर यांनी आरोपी राजू राठोड याची समजूत काढली. पण त्यानंतर रात्री ७ वाजेच्या सुमारास मयत अनिल थोरात हा गावातील मांगीरबाबाच्या ओट्यावर बसला होता. त्यावेळी आरोपी राजू राठोड आणि दिलीप राठोड याने पोलीस पाटलांना नाव का सांगितले म्हणून अनिलला शिवीगाळ केली. यावेळी तिघांमध्ये मारामारी झाली. याच झटापटीत राजू राठोडला चाकू लागून जखमी झाला. त्यानंतर अर्ध्या तासाने राठोड आपल्या साथीदारांना घेऊन अनिलच्या घरी गेला आणि हल्ला चढवला. यावेळी अनिल आणि भारत थोरात जीव वाचवून घरातून पळून गेले. पण दुसऱ्या दिवशी 24 डिसेंबरला रात्री 8.30 वाजता आरोपी राजू राठोड, प्रभाकर पवार, संदीप राठोड, दिलीप राठोड, अंजू राठोड आणि रवी राठोड यांनी कारने पाठलाग करून अनिलला पकडले आणि कारमध्ये उचलून नेऊन घेऊन गेले होते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी अनिलचा मृतदेह आढळून आला आहे. (हेही वाचा - ‘या’ लोकांना देणार कोरोना लशीचा बुस्टर डोस; पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय ) या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात सुनिल थोरात याच्या फिर्यादीवरून आरोपीविरुद्ध भादंवि. 302, 120(ब), 365, 341, 201, 143, 147, 149,323,504, 506, आणि ॲट्रॉसिटी कायद्याच्या 4(1), 1 (S), 3(2)(VA) (अ) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.