नंदुरबार, 26 डिसेंबर: नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्याच्या अक्कलकुवा तालुक्यातील पिंपटीचा माथेपाडा याठिकाणी एक विचित्र घटना समोर आली आहे. घराशेजारून जाणाऱ्या रस्त्याच्या वादातून (road dispute) दोन गटांनी एकमेकांच्या घराला आग लावली (two groups set each others home on fire) आहे. या आगीच्या घटनेत दोन्ही घरांचं प्रचंड नुकसान झालं असून सर्व संसार जळून खाक झाला आहे. यामध्ये रोख रकमेसह अनेक किमती वस्तू जळाल्या आहेत. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात मोलगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास मोलगी पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्कलकुवा तालुक्यातील पिंपटीचा माथेपाडा येथील रहिवासी असणाऱ्या सायसिंग मोवाश्या वसावे, दिलवरसिंग मोवाश्या वसावे, बोला मोवाश्या वसावे, बाजीराव बोला वसावे यांच्या घरा शेजारून गावात एक रस्ता जातो. संबंधितांनी या रस्त्यावर लोखंडी गेट बांधून हा रस्ता बंद केला होता. यावेळी गावातील काही जणांनी याबाबत जाब विचारला असता, संबंधित आरोपींनी पिंमटी पाटील पाडा येथील रहिवासी असणाऱ्या दिलीप वसावे आणि विमलबाई दिलीप वसावे यांच्या घराला आग लावली. हेही वाचा- नाद केला पण वाया गेला! हिंगोलीत अल्पवयीन मुलाकडून बँक फोडण्याचा प्रयत्न या आगीत वसावे कुटुंबाचं प्रचंड नुकसान झालं. ही घटना घडताच पिंपटीचा माथेपाडा येथील रहिवासी असणाऱ्या बोला मोवाश्या वसावे, बाजीराव बोला वसावे यांच्या घराला आग लावून पेटवून देण्यात आलं. या आगीच्या घटनेत बाजीराव वसावे यांच्या घरातील धान्य, कोंबड्या आणि रोख रक्कम जळून खाक झाली. दोन्ही गटांनी एकमेकांची घरं पेटवून दिल्यानंतर, दोन्ही गटांनी मोलगी पोलीस ठाण्यात जाऊन एकमेकांविरोधात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा- वरात निघण्यापूर्वी काही मिनिटे नवरदेवाने केली आत्महत्या, कारण ऐकून सगळेच झाले अव मोलगी पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत दोन्ही गटातील दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी अद्याप कोणालाही अटक केली नाही. सर्व आरोपी फरार असून त्यांचा शोध पोलीस घेत आहेत. रस्त्याच्या वादातून दोन गटांनी एकमेकांची घरं जाळून टाकल्याने परिसरात तणाव निर्माण झाला होता. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.