सांगली, 01 डिसेंबर: गेल्या जवळपास दोन वर्षांपासून महाराष्ट्रासह देशात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे गेली दोन वर्षे राज्यातील शाळा बंद आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर, आजपासून राज्यात पुन्हा एकदा शाळा सुरू होणार (School reopen) आहेत. अशात शाळा सुरू व्हायच्या एक दिवस आधीच सांगलीतील एका शाळकरी मुलीचा दुर्दैवी अंत (School girl died in road accident) झाला आहे. 12 वर्षीय चिमुकली सायकलने रस्त्यावरून जात असताना, तिला ट्रॅक्टरने चिरडलं आहे. या अपघातातनंतर ट्रॅक्टरचालकाना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
अन्वेषा निर्भय विसपुते असं मृत पावलेल्या 12 वर्षीय चिमुरडीचं नाव आहे. मृत अन्वेषा ही मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास सायकलने जात होती. सांगली शहरातील हरिपूर रस्त्यावरून जात असताना, समोरून एक ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर येत होता. त्यामुळे अन्वेषा रस्त्याच्या कडेला असणाऱ्या भरावावर चढली. पण यावेळी तिचा तोल जावून ती थेट उसाच्या ट्रॅक्टरखाली सापडली आहे. या दुर्दैवी अपघातात अन्वेषाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटना घडताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
हेही वाचा-रक्ताचं नातंही विसरले नराधम; दोघा भावांकडून 16 वर्षीय बहिणीवर वारंवार अत्याचार
या घटनेची माहिती सांगली शहर पोलिसांना मिळताच, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळी येऊन घटनास्थळाचा पंचनामा केला. त्यानंतर चिमुकलीचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी पोलिसांनी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संभाजी बाबूराव भोसले असं अटक केलेल्या आरोपी चालकाचं नाव आहे. या घटनेचा पुढील तपास सांगली पोलीस करत आहेत.
हेही वाचा-'मुलीला आणतोय, दारूची व्यवस्था कर', एका फोन कॉलमुळे अपहरणकर्त्यांचा प्लॅन फसला
खरंतर, सांगली शहरातील हरिपूर रस्त्यावर सध्या फुटपाथाचं काम सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी वाळू, माती, मुरूम आणि खडीचा भराव टाकला आहे. या खडीच्या भरावामुळेच चिमुकलीचा मृत्यू झाल्याचा आरोप परिसरातील नागरिकांनी केला आहे. ऐन शाळा सुरू व्हायच्या पूर्वसंध्येला चिमुकलीचा मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Road accident, Sangli