मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /रक्ताचं नातंही विसरले नराधम; दोघा भावांकडून 16 वर्षीय बहिणीवर वारंवार अत्याचार, बीडला हादरवणारी घटना

रक्ताचं नातंही विसरले नराधम; दोघा भावांकडून 16 वर्षीय बहिणीवर वारंवार अत्याचार, बीडला हादरवणारी घटना

प्रातिनिधीक फोटो

प्रातिनिधीक फोटो

Minor Girl Rape in Beed: बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रक्ताच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील दोघांनी आपल्या 16 वर्षीय बहिणीवर वारंवार अत्याचार (2 Brother raped minor sister) केला आहे.

बीड, 01 नोव्हेंबर: काही दिवसांपूर्वी बीड (Beed) जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambajogai) याठिकाणी एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल 400 जणांनी अत्याचार (Minor girl gang raped by 400 people) केला होता. नवऱ्यासोबत वाद झाल्यानंतर पीडित मुलगी आपल्या वडिलांकडे गेली. पण वडिलांनी देखील सांभाळायला नकार दिला. त्यामुळे बसस्थानक परिसरात राहणाऱ्या मुलीवर सहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल 400 जणांनी अत्याचार केला. यामध्ये काही पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील समावेश होता. राज्याला हादरवून सोडणारी ही घटना ताजी असताना, बीडमध्ये आणखी एक संतापजनक घटना घडली आहे.

बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका 16 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर तिच्या सख्ख्या भावाने आणि चुलत भावाने बलात्कार (2 Brother raped minor sister) केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपी भावांनी रक्त्याच्या नात्याला काळिमा फासत आपल्या बहिणीवर अत्याचार केला आहे. संबंधित आरोपी भाऊ बऱ्याच दिवसांपासून आपल्या बहिणीचं लैंगिक शोषण करत होते. दरम्यान पीडित मुलीचं पोट दुखू लागल्यामुळे तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

हेही वाचा-लैंगिक हेतूशिवाय अल्पवयीन मुलीकडे प्रेम व्यक्त करणं हा लैंगिक छळ? कोर्टाचा निकाल

यावेळी पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर (minor sister become pregnant) असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या सख्ख्या भावासह चुलत भावाविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याचबरोबर अन्य एका तरुणावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही भावांना अटक केली असून पुढील कार्यवाही केली जात आहे.

हेही वाचा-घरातील सिक्रेट कॅमेऱ्यात कैद झालं महिलेचं घाणेरडं कृत्य; पाहूनच हादरला पती

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय पीडित मुलगी आपले आई वडील आणि भावासोबत बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते. 17 वर्षीय सख्खा भाऊ आणि 15 वर्षीय चुलत भाऊ मागील बऱ्याच दिवसांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होते. दरम्यान तिच्या पोटात दुखू लागल्यानंतर तिला एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. यावेळी पीडित मुलगी सहा महिन्यांची गरोदर असल्याचं उघडकीस आलं आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

First published:
top videos

    Tags: Beed, Crime news, Rape on minor