Home /News /maharashtra /

कायच्या काय! PUBG खेळता खेळता नांदेडहून गाठलं नाशिक, 12 वर्षीय मुलाचा अजब प्रताप

कायच्या काय! PUBG खेळता खेळता नांदेडहून गाठलं नाशिक, 12 वर्षीय मुलाचा अजब प्रताप

फोटो क्रेडिट - दिव्य मराठी

फोटो क्रेडिट - दिव्य मराठी

पबजी (PUBG) या खेळाच्या संदर्भात तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील. मात्र, या संदर्भात आणखी एक बातमी समोर आली आहे. पबजी खेळता खेळता एक 12 वर्षांचा मुलगा थेट नांदेडहून नाशिकरोड (Nashik Road) येथे पोहेचल्याची घटना समोर आली आहे.

  नाशिक, 6 मे : पबजी (PUBG) या खेळाच्या संदर्भात तुम्ही अनेक बातम्या वाचल्या असतील. मात्र, या संदर्भात आणखी एक बातमी समोर आली आहे. पबजी खेळता खेळता एक 12 वर्षांचा मुलगा थेट नांदेडहून नाशिकरोड (Nashik Road) येथे पोहेचल्याची घटना समोर आली आहे. नागेश माधवराव जाहुरे असे या 12 वर्षीय मुलाचे नाव आहे. तो बिलोरी तालुक्यातील हरनाळा येथील रहिवासी आहे. नेमका काय आहे प्रकार? नागेश हा बुधवारी सकाळी अंगणात मोबाइलवर पबजी खेळ खेळत होता. मात्र, खेळता खेळता तो नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचला. नांदेडहून थेट रेल्वेत बसला. गेममध्ये स्पर्धा वाढत गेल्याने तो गुंतत गेला आणि आपण काय करत आहोत हे कळण्याच्या पलीकडे तो गेला. रेल्वे जशी वेगाने पुढे जात होती त्यानुसार तोही आपल्या घरापासून दूर जात होता. तर तेच दुसरीकडे नागेशच्या घरी त्याची शोधाशोध सुरू झाली. हे प्रकरण रेल्वे पोलिसांपर्यंत पोहोचले. त्याचा फोटोही पोलिसांना देण्यात आला. संध्याकाळ झाली तरी त्याचा शोध लागत नसल्यामुळे त्याच्या घरच्यांची चिंता वाढली होती. अखेर नाशिकरोड पोलिसांना तपोवन एक्सप्रेसमध्ये नागेश हा पोलिसांना आढळला. मात्र, यावेळी तो प्रचंड भेदरला होता. त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता. तर काही तासांनी त्यांनी माहिती दिली आणि मग पोलिसांनी नागेशच्या घरच्यांना त्याच्याबाबत कळवले. यानंतर त्याच्या परिवाराने नाशिकरोड स्थानकात धाव घेतली. आपला मुलगा तब्बल 24 तासांनी मिळाल्यानंतर घरच्यांना विशेष आनंद झाला होता. नागेश हा त्याच्या आजोबांचा लाडका आहे. यामुळे त्याला मोबाइलपासून वापरण्यापासून कुणी थांबवत नव्हते. त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष केले. मात्र, आमचे नशीब चांगले म्हणून आम्हाला आमचा मुलगा सापडला. आमचा मुलगा हरवला असता तर मोबाइल आणि पबजी काय भावात पडले असते? अशी प्रतिक्रिया नागेशचे वडील माधवराव जाहुरे यांनी दिली आहे. हे वाचा - एकमेकींच्या प्रेमात आकंठ बुडाल्या तरुणी; लग्नासाठी घरातून पळून गेल्या पण शेवटी आलं वेगळंच वळण
  पोलीस अधिकारी काय म्हणाले? लाॅकडाऊनमुळे सर्वच मुलांच्या हातात मोबाइल आला आहे. मात्र, आता वातावरण बदलले आहे. त्यामुळे आपली मुले मोबाइलमध्ये काय करतात? याकडे पालकांनी लक्ष देण्याची गरज आहे. तसेच पबजीसारख्या हानिकारक खेळांपासून मुलांना रोखले पाहिजे, असे नाशिकरोड रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश कुलकर्णी यांनी म्हटले आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Nanded, Police, Pubg game

  पुढील बातम्या