जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / हत्येसह 11 गंभीर गुन्हे पण थाटात केला भाजपात प्रवेश, सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं वेलकम!

हत्येसह 11 गंभीर गुन्हे पण थाटात केला भाजपात प्रवेश, सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं वेलकम!

 हत्येच्या गुन्ह्यासह 11 गुन्हे दाखल असलेल्या अजय सरकार यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे

हत्येच्या गुन्ह्यासह 11 गुन्हे दाखल असलेल्या अजय सरकार यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे

हत्येच्या गुन्ह्यासह 11 गुन्हे दाखल असलेल्या अजय सरकार यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे

  • -MIN READ
  • Last Updated :

हैदर शेख, प्रतिनिधी चंद्रपूर, 16 ऑक्टोबर : राज्यात बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपचे सरकार स्थापन झाल्यानंतर दोन्ही गटामध्ये जोरदार इन्कमिंग सुरू आहे. अशातच चंद्रपूरमध्ये हत्या-दंगलीच्या गुन्ह्यातील माजी नगरसेवकाने भाजपात प्रवेश केला आहे. कॅबिनेटमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीतच हा प्रवेश सोहळा पडला. भाजपमध्ये वाशिंग मशीन असल्याचा आरोप विरोधक करत असतात. अशातच गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या माजी नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे चंद्रपूर शहरात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. ( ‘हीच मशाल तुम्हाला महाराष्ट्रात नेस्तनाभूत करेल’, अंबादास दानवेंचं भाजपला चॅलेंज ) चंद्रपूरमध्ये अजय सरकार या अपक्ष नगरसेवकाने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. शनिवारी रात्री शहरातील बंगाली कॅम्प भागात वनमंत्री आणि पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

News18लोकमत
News18लोकमत

शानदार अशा सोहळ्यात हा प्रवेश सोहळा पार पडला. धक्कादायक म्हणजे, हत्या-दंगली सारखे गुन्हे या माजी नगरसेवकावर आहे. गेली 5 वर्षे चंद्रपूर मनपात भाजपची सत्ता आहे. महिनाभरात होऊ घातलेल्या मनपा निवडणुकीसाठी भाजपने जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. (Andheri East Bypoll : 10 वॉर्ड अन् 10 आमदार, अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीसाठी भाजपचा मेगाप्लॅन) मात्र हत्येच्या गुन्ह्यासह 11 गुन्हे दाखल असलेल्या अजय सरकार यांच्या भाजप प्रवेशाने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. बंगाली कॅम्प भागात अजय सरकार याचे मोठे वर्चस्व आहे. मागील वर्षभरात टोळीयुद्ध सदृश्य अनेक प्रकरणात अजय सरकार याचा सहभाग राहिला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात