मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

5 वर्षीय चिमुकलीला पेरूच्या बागेत नेलं अन्..; 67 वर्षीय नराधमाच्या कृत्याने पुणे हादरलं!

5 वर्षीय चिमुकलीला पेरूच्या बागेत नेलं अन्..; 67 वर्षीय नराधमाच्या कृत्याने पुणे हादरलं!

(Photo- shutter stock)

(Photo- shutter stock)

Minor Girl Rape in Pimpri: पुण्यानजीक असणाऱ्या पिंपरी परिसरात एका 5 वर्षीय चिमुकलीला 67 वर्षीय नराधमाने आपल्या वासनेचा शिकार बनवलं आहे.

  • Published by:  News18 Desk

पिंपरी, 26 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून पुण्यासह महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवर आणि महिलांवर होणाऱ्या अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यात एका अल्पवयीन मुलीवर तब्बल 13 जणांनी सामूहिक अत्याचार केला होता. या धक्कादायक घटनेचे संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले होते. यानंतर आता पुण्यानजीक (Pune) असणाऱ्या पिंपरी (Pimpri) परिसरात एका 5 वर्षीय चिमुकलीला 67 वर्षीय नराधमाने आपल्या वासनेचा शिकार बनवलं (Rape on minor girl) आहे. नराधम आरोपीनं पीडित मुलीला आपल्या दुचाकीवर बसवून तिला शेतात घेऊन जात तिच्यासोबत विकृत कृत्य केलं आहे.

ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या आईने दीघी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी बलात्कारासह पोक्सो (POCSO) कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नरधम आरोपीला अटक (Accused arrested) केली आहे. पोलिसांनी आरोपीला न्यायालयासमोर हजर केलं असता, न्यायालयाने आरोपीला पोलीस कोठडी सुनावली आहे. नराधम आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून दीघी पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.

हेही वाचा-काका खाऊला पैसे देतायेत समजून 7 वर्षांची चिमुरडी गेली पुढे, झाली भयंकर अवस्था

शशिकांत आबासाहेब तापकीर (वय-67) असं अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. नराधम आरोपी गुरुवारी (21 ऑक्टोबर) 5 वर्षीय पीडित मुलीला दुचाकीवर बसवून पेरूच्या बागेत घेऊन गेला होता. याठिकाणी नराधमाने एका गोठ्यात पीडित मुलीला घेऊन जात, तिच्यासोबत घृणास्पद कृत्य केलं होतं. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा-संतापजनक! दुप्पट वयाच्या तरुणाशी लावला बालविवाह; काही दिवसातच मुलीचा भयावह अंत

पीडित मुलीच्या आईने रविवारी (24 ऑक्टोबर) रोजी दिघी पोलीस ठाण्यात नराधमाविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. या घटनेची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्कारासह पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून या घटनेचा पुढील तपास दिघी पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Pune, Rape on minor