Home /News /ahmednagar /

11 कोटींचा विमा हडपण्यासाठी रचला खुनी खेळ; कोब्रा नागाचा दंश घडवून निष्पापाचा घेतला बळी

11 कोटींचा विमा हडपण्यासाठी रचला खुनी खेळ; कोब्रा नागाचा दंश घडवून निष्पापाचा घेतला बळी

Crime in Ahmednagar: 20 वर्षे अमेरिकेत राहून भारतात परतलेल्या एका व्यक्तीने विम्याचे पैसे हडपण्यासाठी खुनी खेळ खेळला आहे. आरोपीनं स्वत:च्याच मृत्यूचा बनाव रचला पण गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्याचं कारस्थान उघड झालं आहे.

    अहमदनगर, 26 ऑक्टोबर: 20 वर्षे अमेरिकेत राहून भारतात परतलेल्या एका व्यक्तीने विम्याचे पैसे हडपण्यासाठी (Murder to grab insurance money) स्वत:च्याच मृत्यूचा बनाव रचला आहे. त्यासाठी आरोपीनं आपल्या काही साथीदारांच्या मदतीने एका भोळसर, मनोरुग्ण व्यक्तीचं अपहरण करून त्याला कोब्रा नागाचा दंश घडवून त्याची हत्या (Murder by Cobra snake bites) केली आहे. यानंतर आरोपीनं संबंधित मृतदेह स्वत:चा असल्याची कागदपत्रे तयार करून विमा हडपण्याचा प्रयत्न केला. मात्र गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे आणि विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांमुळे आरोपीचा प्लॅन फसला आहे. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत मुख्य आरोपीसह त्याच्या पाच साथीदारांना अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत. प्रभाकर वाकचौरे (कळस), हर्षद रघुनाथ लहामगे (राजूर), प्रशांत रामहरी चौधरी (धामणगाव), संदीप सुदाम तळेकर (पैठण) आणि हरीश रामनाथ कुलाळ (कोंदणी) असं अटक केल्या पाच आरोपींची नावं आहेत. मुख्य आरोपी प्रभाकर वाकचौरे हा 20 वर्षे अमेरिकेत राहून काही दिवसांपूर्वी मायदेशी भारतात परतला होता. दरम्यान, अमेरिकेत वास्तव्याला असताना आरोपीनं एका अमेरिकन विमा कंपनीत 15 लाख डॉलरचा (11 कोटी रुपये) विमा उतरवला होता. गावी आल्यानंतर आरोपीनं स्वत:च्या नावावरील विमा हडपण्यासाठी खुनी खेळ केला आहे. हेही वाचा-23 व्या वर्षी केली 40 रुपयांची चोरी; 42 वर्षांनंतर कोर्टाकडून निर्दोष सुटका आरोपी प्रभाकर वाकचौरे हा मुळचा राजूर येथील रहिवासी आहे. तर धामणगाव ही त्याची सासुरवाडी आहे. त्याचं धामणगावला सतत येणं जाणं असतं. विम्याचे पैसे हडपण्यासाठी आरोपीनं गावातील मनोरुग्ण असणाऱ्या नवनाथ यशवंत अनाप याच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी आरोपीनं आपल्या काही मित्रांची आणि नातेवाईकांची मदत घेतली. साथीदारांच्या मदतीने आरोपींनी भोळसर मनोरुग्ण नवनाथ अनापचं अपहरण केलं. एक दिवस डांबून ठेवल्यानंतर आरोपींनी कोब्रा या अतिविषारी नागाचा दंश घडवून हत्या केली आहे. हेही वाचा-बापरे! सुपारी समजून अडकित्त्याने फोडला गावठी बॉम्ब; महिलेची झाली भयंकर अवस्था आरोपींनी बरणीतील नाग नवनाथ अनाप याच्या पायाजवळ सोडून त्याला काठीने डिवचलं. यामुळे आक्रमण झालेल्या नागाने अनाप यांच्या पायाला दंश केला. यातच भोळसर अनाप यांचा मृत्यू झाला. अन्य आरोपींनी संबंधित मृतदेह प्रभाकर वाकचौरे याचा असल्याचा बनाव रचला. त्याप्रमाणे राजूर पोलिसांनी देखील प्रभाकर वाकचौरे याची आकस्मिक मृत्यूची नोंद केली. यानंतर आरोपींनी संबंधित कागदपत्रे मिळवून विमा क्लेम केला. पण विम्याची रक्कम मोठी असल्याने विमा कंपनीचे अधिकारी तपास करण्यासाठी गावात दाखल झाले. यावेळी प्रभाकर वाकचौरे जिवंत असल्याची माहिती अधिकाऱ्यांना मिळाली आणि आरोपीचा बनाव उघड झाला आहे. पोलिसांनी आरोपी वाकचौरे याला गुजरातमधून अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास राजूर पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Ahmednagar, Crime news

    पुढील बातम्या