गडचिरोली, 11 मे : गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) कोरोनाने (Corona) थैमान घातले आहे. माओवाद्यांच्या (maoist ) गडाला सुद्धा कोरोनाने विळखा घातला आहे. दंडकारण्यात कोरोना आणि अन्नातून विषबाधा (food poisoning) झाल्याने 10 माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा दंतेवाडा पोलिसांनी केला आहे.
बस्तरसह दंडकारण्यात गेल्या चाळीस वर्षांपासून माओवाद्यांच्या हिंसक कारवाया सुरू आहेत. माओवाद्यांना खरा धोका सुरक्षा दलापासून असतो यावेळी मात्र पहिल्यांदा जगाला धोक्यात आणलेल्या कोरोनाची झळ माओवाद्यांना बसल्याची शक्यता आता निर्माण झाली आहे.
दंडकारण्यात बस्तरसह तेलंगाणा, ओरोसा, आंध्रप्रदेशसह गडचिरोली जिल्ह्याचा भाग येतो. घनदाट जंगलात वावरणाऱ्या माओवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा बस्तर पोलिसांनी केला आहे. माओवाद्यांमध्ये कोरोनासोबत अन्नातून विषबाधा झाल्याने 10 माओवाद्यांचा मृत्यू झाल्याचा दावा बिजानुरचे पोलीस अधीक्षक यांनी केला आहे.
येथे 1 रुपयांत गरजूंना मिळेल Oxygen Concentrator, केवळ करावं लागेल एक ई-मेल
माओवाद्यांचा वावर हा घनदाट जंगलात अतिदुर्गम भागात असतो. या भागात अनेक आदिवासी बहुल गावे आहेत, जिथे माओवाद्याची ये-जा सुरू असते. त्यामुळे माओवाद्यांकडून स्थानिक आदिवासीमध्ये कोरोनाचा धोका वाढल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेषत: माओवादी जी जनअदालत घेतात त्यात शेकडो नागरिक उपस्थित असतात. अशावेळी कुठल्याही सोशल डिस्टिंगचा वापर होत नसल्याने दुर्गम भागात गंभीर परिस्थिती उद्भभवु शकते. अनेक माओवादी नेते कोरोनाच्या गंभीर आजाराने ग्रस्त असून सुजातासारख्या जहाल महिला माओवादीचा त्यात समावेश असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
माओवाद्यांमध्ये पसरलेल्या कोरोनाची गंभीरता लक्षात घेतल्यास शंभरच्या जवळपास माओवादी आजारी असल्याचे सुत्रांनी दंतेवाड़ा आणि तेलंगणाच्या कोत्तागुडम पोलिसांना सांगितल्याचे वृत्त आहे.माओवाद्यांचे अनेक मोठे नेते गंभीर आजारी असल्याचे सांगण्यात आलं आहे.
धन्य! पठ्ठ्याने भारतातून अमेरिकेत नेल्या शेण्या, एअरपोर्टवरच झाली जप्तीची कारवाई
यात जहाल माओवादी कमांडर हिडमाच्या बटालियनमधील आणि प्लाटुन दलमच्या माओवाद्याचा समावेश असल्याचा दावा कोत्तागुडम पोलिसांनी केला आहे. जे माओवादी आत्मसमर्पण करतील त्याचा उपचार करू, असे पोलीस सांगत असून गडचिरोली परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी कोरोनाची किंवा अन्य आजाराची लागण माओवाद्यांना झाल्यास त्यानी आत्मसर्पण करुन मुळ प्रवाहात यावे, पोलीस त्याच्यावर उपचार करतील असे म्हटले आहे.
माओवाद्यांमुळे अतिदुर्गम भागात स्थानिक आदिवासींमध्ये कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता आहे. अलीकडेच बिजापुर जिल्ह्यात सुरक्षा दलावर हल्ला करणा-या कमांडर हिडमाच्या पीपल्स गुरील्ला आर्मीच्या माओवाद्यांना कोरोनाची लागण झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona