वॉशिंग्टन, 11 मे: अमेरिकेच्या सीमाशुल्क
(custom duty) आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी वॉशिंग्टन डीसी उपनगरातील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून भारतातून परत आलेल्या एका प्रवाशाच्या सामानामधून शेणी (गोवऱ्या) ताब्यात घेतल्या आहेत. भारतीय प्रवाशाने ज्या पिशवीमध्ये या शेणी आणल्या होत्या
(US Airport Cow Dung Cakes), ती पिशवी त्याच्याकडून विमानतळावरच राहिली होती.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, अमेरिकेत शेणाच्या गोवऱ्यांवर बंदी आहे. कारण, या गोवऱ्यांमार्फत जनावरांमधील अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक असलेल्या Foot-and-mouth disease नावाच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो, असे येथे मानले जाते. अमेरिकेच्या सीमाशुल्क आणि सीमा सुरक्षा अधिकाऱ्यांनी (कस्टम अॅण्ड बॉर्डर प्रोटेक्शन - सीबीपी) त्या शेणी नष्ट केल्याचे सांगितले आहे.
सोमवारी विभागाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘हे वृत्त खरे आहे’ सीबीपी कृषी तज्ज्ञांना एका सुटकेसमधून दोन शेणी सापडल्या होत्या. त्या जप्त करण्यात आल्या आहेत. निवेदनानुसार, ही सूटकेस 4 एप्रिलला एअर इंडियाच्या विमानातून परत आलेल्या एका प्रवाशाची आहे.
हे वाचा - Sangamner News : अंधश्रद्धेची बाधा! अंगातलं भूत काढतो म्हणून मांत्रिकाने दारु पाजत विवाहितेवर केला अत्याचार
सीबीपीच्या बाल्टिमोरच्या 'फील्ड ऑपरेशन्स'चे कार्यवाहक संचालक कीथ फ्लेमिंग म्हणाले, ‘लाळ्या-खुरकत हा एक असा आजार आहे, ज्याची प्राण्यांच्या मालकांना नेहमी भीती वाटते. तसेच, हे सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा यांच्यासह राज्यातील कृषी सुरक्षा अभियानासाठी धोकादायक आहे.
हे वाचा - बापरे! तरुणीला चुकून एकाच वेळी दिले कोरोना लसीचे सहा डोस, वाचा पुढे नेमकं काय घडलं
सीबीपीने सांगितले की, जगातील काही भागात शेणी हा ऊर्जा देणारा आणि स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून एक महत्त्वाचा घटक आहे. याचा वापर 'स्किन डिटॉक्सिफायर', एक रोगप्रतिरोधक आणि खत म्हणूनही केला जातो. सीबीपीच्या म्हणण्यानुसार, हे अनेक फायदे असूनही, जनावरांच्या तोंडाला चिरा आणि जखमा करणाऱ्या लाळ्या-खुरकरत आजाराच्या भीतीमुळे भारतातून शेणी घेऊन येण्यास मनाई आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.