Home /News /technology /

येथे 1 रुपयांत गरजूंना मिळेल Oxygen Concentrator, केवळ करावा लागेल एक ई-मेल

येथे 1 रुपयांत गरजूंना मिळेल Oxygen Concentrator, केवळ करावा लागेल एक ई-मेल

यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना रुग्णाचं आधार कार्ड, ऑक्सिजन सॅच्युरेशन रिपोर्ट, कोरोना रिपोर्ट, डॉक्टरांची चिठ्ठी आणि कुटुंबातल्या कोणा व्यक्तीचं ओळखपत्र आणि मोबाईलनंबर ही कागदपत्रं पुराव्यासाठी द्यावी लागतील.

नवी दिल्ली, 11 मे: कोरोना महामारीच्या काळात ऑक्सिजनची कमतरता हा सर्वांत गंभीर विषय झाला आहे. ऑक्सिजनअभावी (Oxygen Shortage) अनेक हॉस्पिटल्समध्ये रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अनेक रुग्णांचे नातेवाईक ऑक्सिजनसाठी धावाधाव करत आहेत. वेगवेगळ्या राज्यांना विशेष रेल्वेद्वारे ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नोए़डातल्या (Noida) दोन स्वयंसेवी संस्थांनी एक नवी योजना सुरू केली आहे. त्याद्वारे गरजूंना केवळ 1 रुपयात ऑक्सिजन मिळणार असून, त्यासाठी केवळ एक ई-मेल करावा लागणार आहे. टीव्ही9 ने हे वृत्त दिलं आहे. चॅलेंजर्स ग्रुप (Challengers Group) आणि व्हॉइस ऑफ स्लम (Voice of Slum) या स्वयंसेवी संस्था कोरोनाचा संसर्ग होऊन घरातच उपचार घेणाऱ्या व्यक्तींच्या मदतीसाठी पुढे आल्या आहेत. आर्थिकदृष्ट्या कमजोर असलेल्या व्यक्तींना केवळ एक रुपयात ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर (Oxygen Concentrator) उपलब्ध केला जाणार आहे. हा ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर 10 ते 15 दिवसांसाठी उपलब्ध केला जाईल, असं 'अमर उजाला'च्या वृत्तात म्हटलं आहे. 'व्हॉइस ऑफ स्लम'चे संस्थापक देव प्रताप यांनी सांगितलं, की आतापर्यंत 50 ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर मागवण्यात आले आहेत. त्यामुळे मोठ्या संख्येने ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटरची ऑर्डर नोंदवण्यात आली आहे. चॅलेंजर्स ग्रुपचे अध्यक्ष प्रिन्स शर्मा यांनी सांगितलं, की ज्यांना ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटरची गरज आहे, त्यांनी Challengersgroupofficial@gmail.com किंवा Info@voiceofslum.org या ई-मेल आयडीवर संपर्क साधायचा आहे.

(वाचा - आरोग्य सेतु, Co-WIN वर वॅक्सिनेशन स्लॉट मिळत नाहीये? हे पर्याय ठरतील मदतशीर)

यासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तींना रुग्णाचं आधार कार्ड, ऑक्सिजन सॅच्युरेशन रिपोर्ट, कोरोना रिपोर्ट, डॉक्टरांची चिठ्ठी आणि कुटुंबातल्या कोणा व्यक्तीचं ओळखपत्र आणि मोबाईलनंबर ही कागदपत्रं पुराव्यासाठी द्यावी लागतील. या स्वयंसेवी संस्था कागदपत्रांची पडताळणी करतील आणि त्यानंतर गरजूंना ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर पुरवले जातील. गेल्या दोन दिवसांत देशातल्या नवीन कोरोनाबाधितांच्या (Corona Patients) संख्येत काहीशी घट दिसते आहे. तरीही नवीन बाधितांची रोजची संख्या तीन लाखांच्या वरच आहे. मात्र प्रति दिन चार लाखांवरून आता खाली आली आहे. शनिवार-रविवारी चाचण्यांची संख्या कमी असल्यानेही आकडा घटला असावा, असा एक अंदाज आहे.

(वाचा - कोरोना संकटात Ola ची मोठी घोषणा; गरजूंना मोफत देणार Oxygen Concentrators)

महाराष्ट्रात सोमवारी 37 हजार 236 नवे बाधित आढळले असून 549 जणांचा मृत्यू झाला.

(वाचा - आता प्लाझ्मा डोनर शोधणं होणार सोपं; Snapdeal ने लाँच केलं खास अ‍ॅप, अशी होईल मदत)

देशातली कोरोनाची स्थिती अत्यंत गंभीर असल्यामुळे परदेशांमधूनही मदतीचा ओघ सुरू आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, 6738 ऑक्सिजन कंन्सन्ट्रेटर, 3856 ऑक्सिजन सिलिंडर, 16 ऑक्सिजन जनरेशन प्लांट, 4668 व्हेंटिलेटर/बाय पॅप/सी पॅप आणि तीन लाखांहूनअधिक रेमडेसिवीर इंजेक्शन्स एवढी मदत भारताला परदेशातून मिळाली आहे. त्यांचं राज्यांना गरजेनुसार वाटप केलं जात आहे.
First published:

Tags: Coronavirus, Oxygen supply

पुढील बातम्या