मीरा भाईंदर, 16 जुलै : शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचे इन्कमिंग सुरूच आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठोपाठ आता कोकणातले शिवसेनेचे नेते उदय सामंत सुद्धा 20 नगरसेवकांना फोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कोकणात उदय सामंत यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे मोठी वाताहत झाली आहे. शिवसेनेचे दोन गट पडले आहे. शिंदे गटात मुख्यमंत्रिपद असल्यामुळे अनेक इच्छुकांनी शिंदे गटाची वाट निवडली आहे. रत्नागिरी नगरपरिषदेतील 23 पैकी 20 नगससेवक उदय सामंत यांच्यासोबत असल्याचा दावा सामंत समर्थकांकडून केला जात आहे. नगरपरिषदेतील नगसेवकांचा मोठा गट सामंत यांच्यासोबत असल्याचा दावा सोशल मीडियावरून केला जात आहे. रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उदय सामंत यांची रत्नागिरीच्या शासकीय विश्रामगृहावर अनेक नगरसेवकांनी देखिल भेट घेतली. या नगरसेवकांनी आपण आपल्या सोबत असल्याचं सष्ट केलंय. येणाऱ्या काहीच महिन्यावर नगरपरिषद निवडणूक आली आहे. त्यामुळे उदय सामंतही सेनेला धक्का देणार का हे पाहण्याचे ठरणार आहे. ( Quinoa : वजन कमी करणाऱ्यांसाठी सुपरफूड मानलं जाणारं किनोआ काय आहे? ) दरम्यान, शिवसेनेचे बंडखोर आमदार प्रताप सरनाईक यांनी मीरा भाईंदर महापालिकेतील 9 नगरसेवकांना घेऊन शिंदे गटात प्रवेश केला. मीरा भाईंदर महापालिकेतील शिवसेनेचे 10 नगरसेवक आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटात गुरुवारी दाखल झाले. मुंबईच्या लीला ह्या आलिशान हॉटेलात हा समर्थन सोहळा पार पडला. यावेळी विरोधी पक्षनेते धनेश पाटीलसह नगरसेवक राजू भोईर, कमलेश भोईर, संध्या पाटील, वंदना पाटील, अनंत शिर्के, हेलन गोविंद, एलायस बांड्या हे ८ निवडून आलेले तर विक्रमप्रताप सिंह हे स्वीकृत नगरसेवक आमदार सरनाईक यांच्यासह शिंदे गटात सहभागी झाले. या सोबतच नगरसेविका कुसुम गुप्ता यांचे पती संतोष , दिवंगत नगरसेवक हरिश्चंद्र यांच्या पत्नी पूजा आमगावकर, माजी नगरसेवक हरिश्चंद्र म्हात्रे व राजेश वेतोस्कर, माजी पदाधिकारी महेश शिंदे , विकास पाटील तसंच नुकतीच उपशहरप्रमुख म्हणून नेमणूक झालेले राजू ठाकूर आणि बाबासाहेब बंडे यांनी शिंदे समर्थक म्हणून प्रवेश केला. नगरसेविका केटलीन परेरा यांनी आधीच शिंदे यांना शुभेच्छा देणारा फलक लावत आपली भूमिका दर्शवली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.