सर्वसामान्यपणे झोप येत असल्यास किंवा थकवा जाणवल्यावर अनेकांना जांभया येतात. तुमच्या या सवयीकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका. थकवा, झोप पूर्ण न होणं आणि कामात रस नसल्यामुळे जांभया येतात असा अनेकांचा समज असतो, पण प्रत्येकवेळी हीच कारणं असतात असं नाही. जांभया येण्याचा थेट संबंध आपल्या आरोग्याशी असतो. बहुतांशीवेळा आरोग्याशी निगडीत समस्यांमुळे जास्तप्रमाणात जांभया येतात. नेमकी या जांभया कोणत्या आजारांचा संकेत देतात ते जाणून घेऊ. थायरॉइडची समस्या- सतत जांभया येणं हे थायरॉइड असण्याची शक्यता वर्तवतात. शरीरातील थायरॉइडचे हार्मोन कमी झाल्यामुळे सतत जांभया येतात आणि लोकांना दर काही मिनिटांनी जांभया येतात. यकृत खराब होण्याचे संकेत- या स्थितीत शरीर लगेच थकतं. शरीर थकल्यामुळे जांभया यायला लागतात. त्यामुळे तुम्हाला जास्त जांभया यायला लागल्या तर यकृताची तपासणी वेळीच करून घ्या. या शिवाय सतत जांभया येत असतील तर हायपोथायरॉइड हा आजार असण्याचेही संकेत असू शकतात. शरीरात थायरॉइडचे हार्मोन कमी प्रमाणात बनण्यामुळे हा आजार होतो. उच्च रक्तदाब- याशिवाय ताण तणावामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाचे ठोके वाढू लागतात. यामुळे हृदयापर्यंत आवश्यकत तेवढा ऑक्सीजन पोहोचत नाही. अशा स्थितीत जांभयामार्फत शरीरात ऑक्सिजन पोहोचवला जातो. ब्रेन स्टेम जखमही असू शकते- काही संशोधनात असं सांगण्यात आलं आहे की, ब्रेन स्टेम जखमेमुळे अनेकदा जास्त जांभया येतात. पिट्यूटरी ग्लँड दाबले गेल्यामुळे जांभया येतात. असं जर सातत्याने होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्यावा. याशिवाय तणावामुळे रक्तदाब वाढतो आणि हृदयाची ठोकेही कमी पडतात. यामुळे मेंदूला आवश्यक तेवढा ऑक्सिजन मिळत नाही. अशावेळी जांभयामार्फत ऑक्सीजन शरीरात पोहोचतो. त्यामुळे सतत जांभया येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा. मधुमेहाची समस्या- जास्त जांभया येणं हे मधुमेहात हायपोग्लाइसीमियाच्या सुरुवातीचे संकेत असू शकतात. रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी होते तेव्हा जांभया यायला सुरुवात होते. अशात जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण आहात आणि तुम्हाला सतत जांभया येत असतील तर डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. हृदय आणि फुफ्फुसांचा आजार- चिकित्सकांच्यामते, हृदय आणि फुफ्फुसांच्या आजारांमुळेदेखील जास्त जांभया येतात. जेव्हा हृदय आणि फुफ्फूसं योग्य काम करत नाही तेव्हा दम्याचा आजारही असू शकतो. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. CISF जवानाला हुंड्यात मिळाले 11 लाख रुपये, म्हणाला- ‘मला पैसे नाही तर…’ शरीरातील या छोट्या बदलांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका, नाहीतर… सावधान! चहासोबत सिगारेट ओढणं आजच थांबवा, कारण…
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.