सगळं व्यवस्थित सुरू असताना शरीरात काही बदल व्हायला सुरुवात होते. तेव्हाच आरोग्याचे काही प्रश्न उद्भवू शकतात. अशाच काही बदलांबद्दल पाहा.
डोळे पिवळे होणं - डोळ्यांमधला पांढरा भाग हा शुभ्र असणं हे आरोग्यदायी लक्षण आहे. तो भाग लाल झाला तर झोप पूर्ण न होण्याचं लक्षण आहे. पण जर तो भाग पिवळा झाला, तर काळजी करण्यासारखं आहे. ते पित्ताशयाचं दुखणं असू शकतं.
मानेवरची सूज - सूज असेल तर थायराॅइडची समस्या असू शकते. किंवा इन्फेक्शनही असू शकतं. असं काही झालं तर लगेच डाॅक्टरांशी संपर्क साधा.
पाय थंड पडणं - पाय थंड पडत असतील तर हृदयाची समस्या असू शकते. ऑटोइम्यून डिसऑर्डर Reynoldsमध्ये रक्तवाहिन्या संकुचित होतात.हात आणि पाय थंड आणि पिवळे होत असतील तर धोक्याची घंटा असू शकते.
तीळ - शरीरावरचा तीळ हे सौंदर्याचं लक्षण मानलं जातं. पण तोच तीळ मोठा झाला तर ते कॅन्सरचं लक्षण असू शकतं.
केस गळणं - एरवी प्रत्येकाचेच 100 केस गळतात. पण त्यापेक्षा जास्त केस गळायला लागले तर थायराॅइडची समस्या असू शकते. लगेच डाॅक्टरांना भेटा.
नखांमध्ये बदल - नखं हा आरोग्याचा आरसा असतो. अचानक नखांचा रंग बदलला किंवा नखं तुटायला लागली की समजा शरीरात काही बिघाड झालाय.
ओठ फाटणे - ओठाची त्वचा फाटत असेल तर शरीरातलं पाणी कमी झालंय किंवा व्हिटॅमिनची कमतरता आहे. ओठ नेहमीच फाटलेले राहात असतील तर फंगल इन्फेक्शन असू शकतं.