CISF च्या जवानाला त्याच्या लग्नात मुलीकडच्यांकडून हुंड्यात 11 लाख रुपये देण्यात आले होते. पण जवानाने ते पैसे घेण्यास स्पष्ट नकार दिला आणि होणाऱ्या पत्नीच्या आई- वडिलांकडून फक्त एक नारळ घेतला. त्याच्या या कृतीचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे. नवरदेव जितेंद्र सिंहला यातच आनंद आहे की त्याच्या पत्नीने एलएलबी आणि एलएलएम पदवीधर आहे. एवढंच नाही तर ती आता पीएचडीचं शिक्षण घेत आहे. जितेंद्रच्या आई- वडिलांनी स्पष्ट केलं की ते सुनेला अजून शिकवतील आणि तिला ऑफिसर करतील. टाइम्स ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, 8 नोव्हेंबरला झालेल्या लग्नात नवरीच्या वडिलांनी जितेंद्रला 11 लाख रुपयांनी भरेलेली बॅग देऊ केली. ती बॅग पाहून जितेंद्रने हात जोडले आणि फक्त नारळ आणि मुलगी देण्याची मागणी केली. जितेंद्र म्हणाला की, ‘चंचल (नवरी) सध्या राजस्थान न्यायिक सेवेची तयारी करत आहे आणि जर ती मॅजिस्ट्रेट झाली तर माझ्या कुटुंबाला पैशांपेक्षा जास्त ती गोष्ट मौल्यवान असेल.’ यावर नवरीचे वडील गोविंद सिंह शेखावत म्हणाले की, ‘त्याने जेव्हा पैसे परत केले त्याक्षणाला मी घाबरलो. मला सुरुवातीला वाटलं की नवऱ्याकडचे लग्नाच्या व्यवस्थेवर फारसे आनंदी नाहीत. पण नंतर कळलं की मुलाकडचे हुंड्याच्या विरोधात आहेत.’ सावधान! या सवयींनी तुम्ही पत्नीच्या नजरेतून उतराल …म्हणून लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला दीपिका- रणवीर व्यंकटेश्वर मंदिरात गेले रात्री बाथरूमसाठी सतत उठावं लागतं, वेळीच व्हा सावध; या आजाराला पडू शकता बळी पार्टनरच्या घोरण्याने तुम्ही त्रस्त आहात.. या घरगुती उपायांनी मिळवा आराम तुम्ही नाइट शिफ्ट तर करत नाही ना.. कारण हा आजार होण्याची आहे सर्वाधिक शक्यता
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.