Home /News /lifestyle /

मादीने घातलेली अंडी काही न खाता-पिता हा 50 दिवस ठेवतो तोंडात; दुर्मीळ माशाची किंमत तर ऐका...

मादीने घातलेली अंडी काही न खाता-पिता हा 50 दिवस ठेवतो तोंडात; दुर्मीळ माशाची किंमत तर ऐका...

Arowana gold fish हा एकमेव नर मासा असा आहे, जो मादीने घातलेली अंडी 50 दिवस तोंडात ठेवतो. जेव्हा पिल्लं थोडी मोठी होतात तेव्हा हा मासा तोंड उघडतो.

नवी दिल्ली, 22 जून: एखाद्या स्पेशल माशाची किंमत किती असेल? 2.24 कोटी? विश्वास नाही बसत ना... पण हा आहेच खास मासा. अत्यंत दुर्मीळ आणि त्याची लाइफ सायकल तर आणखी अजब. हा एकमेव नर मासा असा आहे, जो मादीने घातलेली अंडी 50 दिवस तोंडात ठेवतो. जेव्हा पिल्लं थोडी मोठी होतात तेव्हा हा मासा तोंड उघडतो. जोपर्यंत पिल्लं स्वावलंबी होत नाहीत, तोपर्यंत हा मासा त्यांची काळजी घेतो. Arowana gold fish असं याचं नाव. अरोवाना गोल्ड फिश असा दुर्मिळ मासा आहे जो बाजारात कोट्यवधी रुपयांना विकला जातो. ब्लॅक मार्केटमध्ये याची किंमत तब्बल 2.24 कोटी रुपये आहे. हा मासा घरात ठेवल्यास घरात भरभराट होते, संपत्ती आणि पैशांत वाढ होते, असा समज आहे. 50 दिव, हा नर मासा आपलं तोंड बंद ठेवतो. पिल्लांसाठी धोका असेल तर तो त्यांना स्वतःच्या तोंडात ठेवतो आणि त्यांची काळजी घेतो. त्यामुळे या माशांबद्दल लोकांच्या मनात आदर दिसतो. अरेच्चा! इथं कपल एकमेकांना I Love You म्हणत नाही; मग प्रेम व्यक्त करतात कसे? अरोवाना माशाला ड्रॅगन फिशदेखील (dragon fish) म्हटलं जातं. या माशाच्या अनेक प्रजाती आहेत मात्र एशियन अरोवाना ही सर्वात महागडी प्रजाती आहे. ही प्रजाती सर्वात जास्त दक्षिण-आशियाई देशांमध्ये आढळले. वेगवेगळ्या रंगांच्या आधारावर त्यांची नावं ठेवली गेली आहेत. चिनी संस्कृतीत या माशांना फार महत्व आहे. ही प्रजाती प्रसिद्ध झाल्याने सध्या धोक्यात आली आहे. हिरव्या रंगाचा अरोवाना मासा इंडोनेशिया, व्हिएतनाम, म्यानमार, थायलंड, कंबोडिया आणि मलेशियात आढळतो तर सिल्व्हर एशियन मासा बोर्निओत आढळतो. या माशाच्या अनेक उपप्रजातीदेखील आहेत. ग्रेट टेल सिल्व्हर, पिनोह अरोवाना आणि येलो टेल अरोवाना या काही मुख्य उपप्रजाती आहेत. इंडोनेशियातील उत्तर सुमात्रा बेटांवर रेड टेल्ड गोल्डन अरोवाना मासा आढळतो. तर मलेशियात गोल्ड क्रॉसबॅक, ब्लू मलायन आणि बुकित मेरा ब्लू अरोवाना प्रजाती आढळतात. तुमच्या कामाची बातमी! मोबाईल, लॅपटॉपचा सतत वापर करताय? या गोष्टी लक्षात ठेवाच अरोवाना माशाची वाढ 35 इंचांपर्यंत होते. हा मासा घरात ठेवण्यासाठी मोठं अक्वेरिअम लागतं. या माशाचं प्रजनन 3-4 वर्षांत एकदा होतं आणि मादी अरोवाना एका वेळेस 30 ते 100 अंडी देते. ही अंडी इतर माशांच्या तुलनेने मोठी असतात आणि मादीने अंडी दिल्यानंतर लगेच नस मासा ती अंडी तोंडात ठेवतो. या प्रक्रियेला माउथ ब्रूडिंग म्हटलं जातं. अंडी तोंडात ठेवल्यानंतर ती मोठी होईपर्यंत म्हणजेच जवळपास 50 दिवस नर मासा काहीच खात-पित नाही. एशियन अरोवानाची एक प्रजाती सिल्व्हर अरोवाना आहे. ही प्रजाती दक्षिण अमेरिकी बेटांवर आढळते.  माकडांप्रमाणे उडी घेऊन शिकार करत असल्याने या माशाला मंकी फिश म्हटलं जातं. हा मासा पक्षी, उंदीर, सापदेखील खातो. यांचं प्रमुख खाद्य क्रस्टेशिअन, किटक आणि लहान मासे असतं. एशियन अरोवाना प्रजातीला 2006मध्ये IUCN Red List मध्ये टाकलं गेलं. माशांच्या व्यापाराची आंतरराष्ट्रीय संस्था CITESने या माशांच्या विक्रीवर बंदी आणली आहे. मात्र तरीही या माशाची छुपी विक्री होते. एशियन अरोवाना ही प्रजाती दुर्मिळ होत असल्यानं त्यांच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. दुबई पडलं जळगावच्या प्रेमात; वर्षभरात खाल्ली 600 कोटी रुपयांची केळी एशियन अरोवाना घरात ठेवण्यासाठी मोठं आणि मजबूत एक्वेरिअम लागतं. पाणी थोडं अॅसिडिक आणि स्वच्छ असायला पाहिजे तसेच पाण्याचं तापमान 24 ते 30 डिग्रीदरम्यान असावं लागतं. हा मासा मांसाहारी आहे. या माशाला श्रिंप आणि क्रिकेट्स आवडतात. याशिवाय खेकडे, विंचू, फिडर फिश, लहान बेडूकदेखील हा मासा खातो. CITES ने या माशाच्या संरक्षणासाठी सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया आणि दक्षिण पूर्व देशांमध्ये 150 फार्म बनवले आहेत. जगभरात 350 पेक्षा जास्त अरोवाना फार्म आहेत. यापैकी काही CITESमध्ये रजिस्टर्ड नाहीत. दरवर्षी एशियन अरोवानाचा 1482 कोटी रुपयांचा व्यवसाय होतो. या माशाच्या शरीरावरील गोल्डन, रेड आणि ब्लॅक शेल्समुळे याच्या किंमतीत वाढ होते.
First published:

पुढील बातम्या