जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / JioBharat : 999 रुपयांचा 4G मोबाईल आहे तरी कसा? पाहूया...

JioBharat : 999 रुपयांचा 4G मोबाईल आहे तरी कसा? पाहूया...

ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मोबाईल पोहोचवण्याचं रिलायन्सचं ध्येय आहे.

ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मोबाईल पोहोचवण्याचं रिलायन्सचं ध्येय आहे.

सध्याच्या ऑनलाईन पेमेंट्सच्या जगात या केवळ 999 रुपयांच्या मोबाईलवरून हजारोंचे यूपीआय व्यवहार करता येतील.

  • -MIN READ Local18 New Delhi,Delhi
  • Last Updated :

नवी दिल्ली, 3 जुलै : रिलायन्स इंडस्ट्रीजची टेलिकॉम कंपनी जिओने ‘Jio Bharat V2’ लॉन्च केला आहे. हा मोबाईल अत्यंत वाजवी दरात उपलब्ध असेल. त्याची किंमत अवघी 999 रुपये ठेवण्यात आली आहे. या मोबाईलमुळे 10 कोटींहून अधिक ग्राहक लवकरच 2G वरून 4G वर येतील, असा विश्वास रिलायन्स जिओने व्यक्त केला आहे. कंपनीने 7 जुलैपासून जिओ भारत V2ची बीटा चाचणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. महत्त्वाचं म्हणजे या मोबाईलची किंमत 1000 रुपयांपेक्षा कमी असली, तरी त्याचे फिचर्स मात्र एखाद्या प्रीमियम फोनपेक्षा कमी नाहीत. जाणून घेऊया, हा मोबाईल नेमका आहे तरी कसा…

News18लोकमत
News18लोकमत

‘जिओ भारत V2’ हा 4G मोबाइल हातात घेतल्यावर त्याचं वजन 71 ग्रॅम इतकं जाणवेल. 4.5 सेमी इतकी त्याची स्क्रीन असेल. 0.3 मेगापिक्सेल कॅमेरा, 1000 mAh बॅटरी, 3.5 मिमी हेडफोन जॅक, ब्लूटूथ, टॉर्च, अशी या मोबाईलची वैशिष्ट्य आहेत. शिवाय त्यात 128 GB SD मेमरी कार्ड असेल. तसेच या मोबाईलवरून HD व्हॉईस कॉलिंग करता येईल आणि त्याचे स्पिकर्सही अतिशय शक्तिशाली असतील. आपण या मोबाईलमध्ये FM रेडिओदेखील ऐकू शकता. त्याचबरोबर जिओ सिनेमा आणि जिओ सावनमधील लाखो गाणी ऐकण्याचा अनुभवही घेता येईल. JioBharat : रिलायन्स जिओचा धमाका! लाँच केला 999 रुपयांचा 4G फोन सध्याच्या ऑनलाईन पेमेंट्सच्या जगात या केवळ 999 रुपयांच्या मोबाईलवरून हजारोंचे यूपीआय व्यवहार करता येतील. या मोबाईलमध्ये 22 भारतीय भाषा उपलब्ध असतील. दरम्यान, देशभरात रिलायन्स जिओचे तब्बल 43 कोटींहून अधिक ग्राहक आहेत. आता ग्रामीण भागात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मोबाईल पोहोचवण्याचं रिलायन्सचं ध्येय आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात