हातांमार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका; मग आता पायांनीच लिफ्ट चालणार

हातांमार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका; मग आता पायांनीच लिफ्ट चालणार

चेन्नई मेट्रोने (Chennai Metro) पायाने चालणारी लिफ्ट (Lift) तयार केली आहे.

  • Share this:

चेन्नई, 30 मे : देशातील कोरोनाव्हायरसची (Coronavirus) वाढती प्रकरणं पाहता, सरकारने लॉकडाऊन लागू केलेला आहे. यामध्ये काही बाबतीत सरकारने सूट दिली आहे. देशात ट्रेन सेवा मर्यादित स्वरूपात सुरू करण्यात आली आहे मात्र अद्याप मेट्रोला परवानगी नाही देण्यात आली. काही दिवसांतच मेट्रोही (Metro) सुरू होईल या आशेने मेट्रो प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणजे चेन्नई मेट्रोने (Chennai Metro) पायाने चालणारी लिफ्ट (Lift) तयार केली आहे.

लिफ्टने जायचं म्हटलं की हाताने बटणं दाबावी लागतात आणि हातांमार्फत कोरोनाव्हायरस पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे लिफ्टमार्फत कोरोनाव्हायरस मोठ्या प्रमाणात पसरू शकतो. मात्र जर लिफ्टसाठी हातांचा वापर केलाच नाही तर, हा धोका टाळता येऊ शकतो. मात्र हे कसं शक्य आहे. तर ते शक्य करून दाखवलं आहे, चेन्नई मेट्रोने. त्यांनी पायाने चालणारी लिफ्ट तयार केली आहे.

सध्या तरी अशी लिफ्ट चेन्नई मेट्रो रेल लिमिटेडच्या अॅडमिनिस्ट्रेशन बिल्डिंगमध्ये (CMRL) आहे. काही दिवसांतच सर्व स्टेशनवर अशी लिफ्ट असेल. पुन्हा सेवा सुरू करण्यासाठी चेन्नई मेट्रो मोठ्या स्तरावर तयारी करत आहे. लोकांची सुरक्षितता लक्षात घेत आणखी काही पावलं उचलली जाणार आहेत.

हे वाचा - फाइव्ह स्टार हॉटेलमध्येही होणार कोरोना रुग्णांवर उपचार; 'या' राज्याने सुरू केली

तामिळनाडून कोरोना रुग्णांची संख्या 20 हजारांच्या पार गेली आहे. गेल्या 24 तासांत 874 प्रकरणं समोर आलीत. एकूण रुग्णांची संख्या आता 20246 वर पोहोचली आहे. राज्यात सलग तीन दिवस कोरोनाची 800 पेक्षा अधिक नवीन प्रकरणं येत आहेत. तर मृतांचा आकडा 154 झाला आहे.

संकलन, संपादन - प्रिया लाड

हे वाचा - PPE सूटच्या आत फक्त इनर घालून ही नर्स करतेय कोरोना रुग्णांवर उपचार, PHOTO VIRAL

First published: May 30, 2020, 4:59 PM IST

ताज्या बातम्या