नवी दिल्ली, 03 मे : तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा धाप लागत असेल, तुमच्या छातीत घट्टपणा जाणवत असेल, श्वास घेताना घरघर आवाज येत असेल, तुमच्या नाडीची गती जास्त असेल, तुम्हाला तीव्र खोकला असेल, तुमची नखे आणि ओठ निळे पडत असतील, तर हे तीव्र दम्याच्या अटॅकची लक्षणे असू शकतात. अशा परिस्थितीत आपण थेट आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधावा. आपले अस्थमाचे निदान झाले असेल तर सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टरांनी दिलेली औषधे घेऊन तुमचा आजार आटोक्यात आणावा लागेल. त्यानंतर हा आजार आणखी वाढू नये किंवा नियंत्रणात राहण्यासाठी तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही, तर त्याचा उपचार तुमच्या स्वयंपाकघरातच दडलेला (World Asthma Day 2022) आहे. शालीमार बाग मॅक्स हॉस्पिटलमधील पल्मोनोलॉजी विभागाचे संचालक डॉ. इंदर मोहन चुग यांच्या मते, मध दम्याच्या रुग्णांसाठी वरदान आहे. व्हिटॅमिन बी आणि अनेक खनिजे असल्याने मध तुमच्या श्लेष्माला पातळ करून शरीरातून काढून टाकण्यास मदत करतो. त्यामुळे दम्याचा आजार असलेल्या लोकांनी मध नियमित खा. याशिवाय ऑलिव्ह ऑईल, शेंगदाणे, सफरचंद, वनस्पती तेल यांसारख्या व्हिटॅमिन ई-युक्त पदार्थांचे सेवन दम्याच्या उपचारात उपयुक्त ठरते. त्याच बरोबर शेंगदाणे, अंकुरलेले धान्य अशी व्हिटॅमिन बी ने युक्त गोष्टी भरपूर प्रमाणात घेतल्याने छातीत जडपणा, खोकला, श्वासोच्छवासाची समस्या कमी होते. दमा नियंत्रित करण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा- डॉ. इंदर मोहन चुघ यांच्या मते, दम्यावर चांगले नियंत्रण येईपर्यंत डॉक्टरांनी सांगितलेली औषधे आणि इनहेलरचा वेळेवर वापर केला पाहिजे. दम्याचा झटका येण्याचा धोका वाढेल, अशा कोणत्याही गोष्टी खाणं टाळा. आहारावर नियंत्रण ठेवा आणि अन्न हळूहळू चावून खा. गरम मसाले, लाल मिरची, लोणचे यांचे सेवन करू नका किंवा फार कमी प्रमाणात खा. नियमित प्राणायामासह योगासने केल्याने श्वासोच्छवासाच्या नळ्या अरुंद होण्यापासून बऱ्याच अंशी आराम मिळू शकतो. जीवनशैलीतील योग्य बदल आणि उत्तम आहार यातून दम्याचा आजार ब-याच अंशी आटोक्यात ठेवता येतो, असे ते म्हणाले. हे वाचा - शरीरात रक्तवाढीसाठी या तीन गोष्टी ठरतील रामबाण, आहारात करा सामील दमा आजार का होतो? डॉ.इंदर मोहन चुघ यांच्या मते, अस्थमाच्या आजारासाठी पर्यावरण प्रदूषण आणि अनुवांशिक घटक प्रामुख्याने जबाबदार आहेत. त्यामुळे ज्या लोकांचे पालक अस्थमाच्या आजाराने ग्रस्त आहेत, त्यांच्या मुलांना धोका अधिक वाढतो. हिवाळ्याच्या काळात, सामान्य व्यक्तीच्या श्वासोच्छवासाच्या नळ्या देखील किंचित संकुचित होतात, त्यामुळे या काळात दमा होण्याचा धोका वाढतो. याशिवाय हवामानातील बदलांचा परिणाम श्वासोच्छवासाच्या नलिकांवरही होतो, त्यामुळेही ही समस्या उद्भवू शकते. ज्या लोकांना धूळ, धूर, पाळीव प्राणी आणि कोणत्याही औषधांची ऍलर्जी आहे, त्यांनी विशेष सावधगिरी बाळगली पाहिजे. कारण ही ऍलर्जी दम्याचे ट्रिगर म्हणून काम करते. उष्ण आणि दमट वारे देखील दम्याचे कारण बनतात. मानसिक तणाव देखील दम्याचे कारण - डॉ. इंदर मोहन चुग यांनी सांगितले की, मानसिक तणाव हा देखील अप्रत्यक्षपणे दम्याचे कारण असू शकतो. त्यांनी सांगितले की, सततच्या मानसिक तणावामुळे शरीराची प्रतिकारशक्ती कमी होते आणि दमा होण्याचा धोका वाढतो. दमा हा प्रामुख्याने अॅलर्जीशी संबंधित आजार आहे. त्याचा हिवाळ्याबरोबरच उन्हाळ्यातही तितकाच परिणाम होतो. याशिवाय अनेक प्रकारच्या कणांच्या संपर्कात आल्यानेही दमा होऊ शकतो. त्यामुळे दम्याच्या रुग्णांना ऋतू कोणताही असो काळजी घेण्याचा सल्ला दिला जातो. ज्या ठिकाणी धूळ किंवा लहान कण आहेत तेथे जाणे टाळा. हे वाचा - या गावात जन्माला येतात फक्त मुली, वैज्ञानिकही हैराण; प्रशासनाने उचललं मोठं पाऊल मुलांवर दम्याचा झपाट्याने परिणाम होत आहे - जागतिक स्तरावर 350 दशलक्षाहून अधिक लोक दम्याने ग्रस्त आहेत, त्यापैकी भारतात सर्व वयोगटातील किमान 30 दशलक्ष रुग्ण आहेत. WHO च्या मते, सुमारे 15 टक्के (45 लाख) दम्याचे रुग्ण 5 ते 11 वयोगटातील आहेत. ते म्हणाले की अलीकडे उदयास आलेल्या ट्रेंडनुसार, दम्याच्या रुग्णांमध्ये श्वासोच्छवासाच्या मोठ्या तक्रारींमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. असे दिसून आले आहे की, दमा असलेल्या किमान 60 टक्के रुग्णांना COPD ची गरज असते. उरलेल्या 40 टक्के दमा रुग्णांमध्ये घरघर, उच्च रक्तदाब इत्यादी तक्रारी दिसून येतात. अस्थमाच्या आजारात वाढ होण्यासाठी खराब रस्त्यांमुळे उडणारी धूळ आणि वाहनांच्या धुराचा मोठा परिणाम होत आहे, असे डॉ. इंदर मोहन चुघ यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.