नवी दिल्ली, 3 मे : बऱ्याचदा आपल्या शरीरात रक्त कमी असेल किंवा हिमोग्लोबीन कमी झाल्यास आपल्याला अनेक रोगांचा सामना करावा लागतो. आपल्या रक्तात लाल आणि पांढऱ्या अशा दोन रंगांच्या पेशी असतात. आपल्या रक्तात लाल रक्तपेशी (Red Blood Cells) आवश्यक प्रमाणापेक्षा कमी होतात, तेव्हा शरीरात रक्ताची कमतरता (Blood Deficiency) निर्माण होते. त्या वेळी अशक्तपणा जाणवतो. त्याला ॲनिमिया (Anemia) असं म्हणतात. अॅनिमिया असणाऱ्या लोकांच्या शरीरातील रक्तात लोहाचं प्रमाण योग्य असलं तरीही रक्त कमी असतं. अॅनिमिया असणारे लोक शरीरातील ऊर्जेचं प्रमाण आणि रक्ताचं प्रमाण कमी असल्यानं लवकर थकतात. आज आम्ही तुम्हाला शरीरातील रक्ताची कमतरता दूर करणाऱ्या तीन फळांबदद्ल सांगणार आहोत. यामुळे अवघ्या 15 दिवसांत तुमच्या शरीरातील रक्ताची कमतरता दूर होईल आणि नवीन रक्तदेखील तयार होऊ लागेल. रक्ताची कमतरता नसणाऱ्या लोकांनीही निरोगी आणि सुदृढ राहण्यासाठी या फळांचे (Fruits) सेवन करणं उपयुक्त ठरेल. बीट - बिटाचा (Beet) ज्यूस प्यायल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. याशिवाय शेंगदाणे गूळ घालून बिट खाल्ल्याने शरीरातील लोहाचं प्रमाण वाढतं. बीट ज्यूस प्यायल्याने शरीरातील रक्ताचं प्रमाण वाढतं. तर, गूळ आणि शेंगदाण्यामुळे आपल्या शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढते. बीटाची कोशिंबीर, कच्चं बीट किंवा उकडलेलं बीट तसंच बीट ज्यूस काहीही तुम्ही सेवन करू शकता. बीट खाल्ल्यामुळे शरीरात लोहाचं प्रमाण वाढतं यासोबत रक्त वाढण्यासाठी मदत होते. शक्य असेल तर रोज सकाळी दूध, चहा घेण्याऐवजी बीटाचा ज्यूस घेतला तर ते शरारीसाठी उत्तम असतं. अंजीर - अंजीर हे शारीरिक कमजोरी दूर करण्यासोबतच शरीरातील रक्तही वाढवतं. तुम्ही अंजीर रात्री भिजवून सकाळी उठल्यानंतर खाल्लं तर तुमच्या शरीरातील रक्त वाढण्यास मदत होईल. डाळिंब - डाळिंब (Pomegranate) हे रोज खाल्लं तरीही शरीरासाठी उत्तम आहे. थंड गुणधर्म असणाऱ्या डाळिंबामुळे शरीरातील रक्त वाढण्यासोबतच हिमोग्लोबिन (Haemoglobin) वाढण्यासही मदत होते. डाळिंबामध्ये विटॅमिन ए, सी आणि ई असतं. डोकेदुखी, उदासीनता, आळस दूर करण्यासाठी डाळिंबाचे दाणे रोज खावेत, त्यामुळे प्रकृती सुधारण्यास मदत होते. हे वाचा - वाढत्या वयानुसार ब्लड शुगर लेवल नेमकी किती असावी? जाणून घ्या काय आहे तज्ज्ञांचं म्हणणं ॲनिमिया किंवा आयनचं प्रमाण शरीरात बऱ्याचदा कमी असल्यानं थकवा जाणवतो. डोकं आणि शरीर दुखतं. काही वेळा अतिअशक्तपणामुळे तुमची इम्युनिटीही कमी होते. त्यामुळे शरीरात रक्ताचं प्रमाण कमी होऊ न देण्यासाठी या काही गोष्टी कटाक्षानं पाळणं आवश्यक आहे. अंजीर, बीट किंवा डाळिंब खाणं हे कुणालाही परवडू शकतं आणि बाजारात सहज उपलब्ध असतं. त्यामुळे त्याचं सेवन करणं सहज सोपं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.