मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

दिवाळीत Beautiful दिसायचं आहे? एथनिक लूक हवाय?, मग नक्की या अ‍ॅक्सेसरीजचा करा वापर

दिवाळीत Beautiful दिसायचं आहे? एथनिक लूक हवाय?, मग नक्की या अ‍ॅक्सेसरीजचा करा वापर

महिला पारंपरिक (Traditional) कपडे (Clothes) आणि अ‍ॅक्सेसरीजला (Accessories) प्राधान्य देतात. त्यामुळं दिवाळीदरम्यान पारंपरिक फॅशनचे नवनवीन ट्रेंडही येतात.

महिला पारंपरिक (Traditional) कपडे (Clothes) आणि अ‍ॅक्सेसरीजला (Accessories) प्राधान्य देतात. त्यामुळं दिवाळीदरम्यान पारंपरिक फॅशनचे नवनवीन ट्रेंडही येतात.

महिला पारंपरिक (Traditional) कपडे (Clothes) आणि अ‍ॅक्सेसरीजला (Accessories) प्राधान्य देतात. त्यामुळं दिवाळीदरम्यान पारंपरिक फॅशनचे नवनवीन ट्रेंडही येतात.

नवी दिल्ली, 29 ऑक्टोबर: एखादा सण असो किंवा दुसरा एखादा समारंभ महिला आपल्या आकर्षक पेहरावानं सर्वांच लक्ष वेधून घेतात. पाहुण्यारावळ्यांच्या गर्दीमध्ये इतरांपेक्षा वेगळं उठून दिसण्यासाठी आपला लूक कसा हटके करता येईल, असा प्रत्येकीचा प्रयत्न असतो. नटण्या-मुरडण्यासाठी दिवाळीचा (Diwali) सण ही नक्कीच एक उत्तम संधी आहे. तीन-चार दिवस चालणाऱ्या दिवाळसणासाठी महिलावर्ग जोरदार तयारी करतो. याकाळात बहुतांश महिला पारंपरिक (Traditional) कपडे (Clothes) आणि अ‍ॅक्सेसरीजला (Accessories) प्राधान्य देतात. त्यामुळं दिवाळीदरम्यान पारंपरिक फॅशनचे नवनवीन ट्रेंडही येतात. मात्र, काही अ‍ॅक्सेसरीज अशा आहेत ज्या कायम ट्रेंडी वाटतात. त्यांचा कधीही वापर केला तरी त्या आपल्याला क्लासिक लूक देतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही बेसिक आणि पारंपारिक अ‍ॅक्सेसरीजच्या (Traditional Accessories) वापराविषयी माहिती देणार आहोत. या अ‍ॅक्सेसरीज दिवाळीच्या सणाला वापरू शकता. त्यामुळे तुम्ही नक्कीच अधिक सुंदर दिसाल. दिवाळीच्या पारंपरिक कपड्यांसोबत ट्राय करा या अ‍ॅक्सेसरीज मांग टीका (बिंदी) मांग टीका (Maang Teeka) हा केसांच्या मध्यभागी कपाळापर्यंत घातला जाणारा एक पारंपरिक दागिना आहे. त्याला काही ठिकाणी बिंदी देखील म्हणतात. तुम्ही लेहेंगा, पंजाबी सूट, साडी इत्यादीसोबत त्याला कॅरी करू शकता. जर तुम्ही दिवाळीच्या कार्यक्रमांमध्ये पारंपरिक पोशाख करण्याचा विचार करत असाल, तर त्यासोबत मांग टीका नक्की ट्राय करा. त्यामुळं तुमचा लूक आणखी भारी दिसेल. डौलदार झुमके वाढवतील कानांची शोभा कुठलाही ड्रेस घाला त्यावर एखादं सुटेबल कानातलं घातलं की तुमचा लूक आणि चेहरा एकदम खुलून दिसतो. त्यामुळे दिवाळीच्या पारंपरिक कपड्यांवर न चुकता डौलदार झुमके (Jhumka) घाला. झुमके म्हणजे लोंबणारी कानातली. झुमक्यांमुळं तुमचा ट्रॅडिशनल लूक एकदम परिपूर्ण होऊन जाईल. झुमक्यांसोबत तुम्ही एखादा नेकपीसदेखील ट्राय करू शकता. जर तुम्हाला गळ्यामध्ये काही घालणं आवडत नसेल तर नाही घातलं तरी चालेल. कारण, तुमचे झुमके त्याची कसर भरून काढतील. आजकाल लहान-मोठ्या आकाराचे आणि वजनाला हलके व आरामदायी असणारे अनेक झुमके बाजारात सहज मिळतात. हेही वाचा-  'Computer' आणि 'Mouse' ची जोडी आहे खास! या उपकरणाला उंदराचं नाव पडलं तरी कसं?
 नाजूक चोकर (Choker) वाढवेल गळ्याचं सौंदर्य
अनेकदा आपल्या घरातील आजी किंवा आई आपल्याला गळ्यातमध्ये काही तरी घालण्यास सांगतात. सणासुदीला गळा रिकामा ठेवू नये असं त्यांचं म्हणणं असतं. मात्र, काही मुलींना किंवा महिलांना गळ्यामध्ये जास्त ओझं घालायला नको वाटतं. अशा वेळी एखादा नाजूक चोकर तुमची अडचण दूर करण्यासाठी उपयुक्त ठरतो. विशेषत: डीप नेक ड्रेससोबत चोकर हा खूप चांगला पर्याय आहे. तुमचा ड्रेस गोल नेकचा किंवा साधा असेल तर तुम्ही त्याच्यासोबत चोकर घालू शकता. डिझायनर बांगड्या ट्रॅडिशनल ड्रेससोबत सुंदर बांगड्या (Bangles) घातल्या तर तुमच्या लूकला नक्की 'चार चाँद' लागतात. त्यामुळं या दिवाळीला बांगड्या नक्की ट्राय करा. बाजारात तुम्हाला तुमच्या ड्रेसला सूट होणाऱ्या बांगड्यांचे विविध प्रकार मिळतील. एक लहानशी टिकली देईल परिपूर्ण लूक आजकाल मुली आपल्या कपाळावर दररोज टिकली लावत नाहीत. मात्र, एखाद्या दिवशी टिकली लावली की तुमचा चेहरा एकदम खुलून दिसतो. विशेषत: जेव्हा पंजाबी सूट, लेहंगा किंवा साडीसोबत टिकली लावल्यास नक्कीच तुम्ही आणखी सुंदर दिसता. त्यामुळं या दिवाळीला एखादी डिझायनर किंवा साधी लाल-काळी टिकली नक्की ट्राय करून पहा. हेही वाचा-  डोकेदुखी असो वा अंगदुखी, आता Painkiller खाणं सोडा; फक्त हे फळ खाऊन दूर होतील वेदना
हेयर लेयर्ड चेन जितकं महत्त्व तुमच्या कपड्यांना आहे तितकचं महत्त्व तुमच्या केसांना देखील दिलं जातं. त्यामुळं तुमच्या कपड्यांना सूट होईल अशी एखादी हेयरस्टाईल करणं अतिशय आवश्यक आहे. दिवाळीच्या पारंपरिक कपड्यांसोबत तुम्ही केसांसाठी हेयर लेयर्ड चेन वापरू शकता. गळ्यात खालण्याच्या साध्या चेनपासून देखील तुम्ही हेयर चेन तयार करू शकता. घड्याळ प्रसंग कुठलाही असो हातामध्ये घड्याळ घातलं की, एकदम चांगला लूक येतो. घड्याळ ही अशी गोष्ट आहे कधीही आऊट ऑफ ट्रेंड होत नाही. त्यामुळं तुम्ही यावर्षी (2021) दिवाळीला पारंपरिक कपड्यांसोबत एखादं डिझायनर घड्याळ नक्की घाला. पैंजण (अँकलेट) नाजूक पैंजणांचा किणकिणाट प्रत्येकाला आकर्षित करतो. बाजारात तुम्हाला अँकलेटचे अनेक प्रकार मिळतील. तुम्ही गोल्डन, सिल्व्हर किंवा इतर डिझाईनचे अँकलेट घालू शकता. मोती आणि कुंदन अँकलेट्स देखील तुमचा ड्रेस अधिक खुलवण्यास मदत करतील. जर तुम्ही विवाहित असाल तर त्यासोबत मॅचिंग जोडवी (Toe ring) देखील घालू शकता. हेही वाचा-  6 महिने टिकणारी खंमग चकलीची भाजणी कशी करायची?
 नोज पिन
नाजूकशा नोज पिनमुळं तुमचा लूक एकदम क्लासिक दिसू शकतो. त्यामुळं ड्रेसला सूट होईल, अशी एखादी नोज पिन या दिवाळीला नक्की ट्राय करा. कधीही आउट ऑफ ट्रेंड न होणाऱ्या या अ‍ॅक्सेसरीज वापरून तुम्ही आणखी सुंदर दिसू शकता. त्यामुळं या दिवळीला यापैकी काही अ‍ॅक्सेसरीज नक्की ट्राय करा आणि मस्तपैकी तुमच्या नवीन ड्रेससह मिरवा.
First published:

Tags: Diwali Fashion, Lifestyle

पुढील बातम्या