मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

6 महिने टिकणारी खंमग चकलीची भाजणी कशी करायची?

6 महिने टिकणारी खंमग चकलीची भाजणी कशी करायची?

अलीकडे चकली खुशखुशीत होण्यासाठी बरेचजण मैद्याचा वापर करतात मात्र ते योग्य नाही. घरातील साहित्यापासून पौष्टिक आणि किमान सहा महिने टिकणारी खंमग अशी चकलीची भाजणी  (chakli bhajni recipe in marathi) कशी करायची?

अलीकडे चकली खुशखुशीत होण्यासाठी बरेचजण मैद्याचा वापर करतात मात्र ते योग्य नाही. घरातील साहित्यापासून पौष्टिक आणि किमान सहा महिने टिकणारी खंमग अशी चकलीची भाजणी (chakli bhajni recipe in marathi) कशी करायची?

अलीकडे चकली खुशखुशीत होण्यासाठी बरेचजण मैद्याचा वापर करतात मात्र ते योग्य नाही. घरातील साहित्यापासून पौष्टिक आणि किमान सहा महिने टिकणारी खंमग अशी चकलीची भाजणी (chakli bhajni recipe in marathi) कशी करायची?

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 27 ऑक्टोबर : दिवाळी तोंडावर आली आहे. सर्व घरातून फराळाचा वास येत आहे. मात्र या सगळ्या फराळात सगळ्यांचा आवडता एक पदार्थ असतो तो म्हणजे खंमग ..खुशखुशीत चकली (Crispy Chakli recipe). अलीकडे चकली खुशखुशीत होण्यासाठी बरेचजण मैद्याचा वापर करतात मात्र मैदा तेल जास्त खातो. अशावेळीस घरातील साहित्यापासून आणि तीही पौष्टीक आणि हो सहा महिने टिकणारी खंमग अशी चकलीची भाजणी   (chakli bhajni recipe in marathi) कशी करायची हेच आपण आज सांगणार आहे. तेही एक किलोचे प्रमाणानुसार.. ही भाजणी तुमी कोणत्याही रूतुमध्ये करू शकता. ही भाजणी टिकण्यासाठी तुम्हाला कोणतही प्रिजर्वेटिव वापराची गरज नाही.

कुरकुरीत आणि खुशखुशीत चकलीची भाजणी कशी करायची त्यासाठी लागणारं साहित्य:

1. अर्धा किलो तांदूळ (तांदूळ पाण्याने धुवून घ्यावेत व सुती कपड्यावर सावलीत वाळत घालावेत)

2.एक वाटी हरभऱ्याची डाळ ( यापैकी कोणतेगी डाळ धुवून घ्यायची नाही)

3.एक वाटी  मुगाची डाळ

4.एक वाटी  उडीद डाळ

5.एक वाटी फुटाण्याची डाळ, (असेला तर वापरा नसेल तर नको)

6.एक वाटी  पोहे

7.एक वाटी शाबू तांदूळ,कच्चे

भाजणी साठी लागणारा मसाला

एक किलो चकली भाजणी तयार करताना यामध्ये एक चमचा जिरे आणि एक चमचा धणे हलके गरम करून टाकायचे आहेत.

चकली भाजणीची कृती

तांदूळ कसं भाजावं काही टिप्स्

भाजणीसाठी लागणारं तांदूळ पहिल्यांदा मंद गॅसवर खरपूस भाजून घ्यायचे. तांदूळ काळे पडणार नाही याची काळजी घ्यायची आहे. महत्त्वाची टीम म्हणजे भाजताना सारखं हालवत राहयचे म्हणजे कोणताही घटक पदार्थ चिकटत नाही व करपत नाही.

डाळी व इतर साहित्य कसं भाजावंं काही टिप्स्

आता भाजणीसाठी लागणाऱ्या इतर डाळी मूग, हरभर इ.. या देखीव वेगवेळ्या खंमग अशा भाजून घ्यायच्या आहेत. कारण एकत्र करून भाजल्या तर काही डाळी या हलक्या असतात त्यामुळे त्या करपू शकतात व त्यामुळे तुमचा भाजणीचा रंग तर बदलणारच पण चवीलाही छान लागत नाहीत. त्यामुळे भाजणी नीट करणं महत्त्वाचं आहे. पोहे देखील साधारण गरम क्रंची करून घ्यावेत. यासोबत शाबूचे तांदूळ देखील भाजून घ्यायचे आहेत.

भाजल्यानंतर हे सगळ एकत्र करून ते थंड करायचं व दळायचं पण या टिप्स् वापरून

भाजल्यानंतर हे सगळ एकत्र करून ते थंड करायचं आणि दळून आणायचे. पण दळून आणायच्या आधी काही महत्त्वाच्या टीप्स ज्यामुळे बऱ्याच जणींची चकली चिवट होते . हे टाळण्यासाठी चकली भाजणी पीठ करण्याआधी घरातून अर्धा किलो तांदूळ घेऊन जावे ते आधी गिरणीतून दळून घ्यावे व नंतर भाजणी दळून घ्यावे. यामुळे हे पीठ सहा महिन्यापेक्षाही जास्त तर टिकतेच पण याला कसलाही कुबट वास देखील येत नाही. आणि चकली देखील जास्त तेल ओडून घेत नाही आणि कुरकुरीत आणि खंमग खुशखुशीत होते.

" isDesktop="true" id="623615" >

एक किलोचं प्रमाण 

ही चकली भाजणी एक किलोचं प्रमाण सांगितलं आहे. जास्त करायची असेल तर प्रमाण वाढवून करता येते.

चकलीची भाजणी कधीही गव्हाच्या पिठावर दळायची नाही. यामुळे चकली चिवट व लगेच मऊ पडते. त्यामुळे या सगळ्या टीप्स फॉलो करून तुम्ही ही भाजणी करू शकता व दिवाळी साजरी करू शकता..

चकल्या कशा बनवायच्या

या पिठात चवीनुसार तिकट, मीठ व कोणताही चकली मसाला व पांढरे तिळ व वरून चार चमचे मोहन घालावे. पीठ मळून घेऊन चकल्या गाळून घ्याव्यात. तेलात तळून घ्यायचे. खूप मोठ्या गॅसवर चकल्या तळायच्या नाहीत. मिडियम गॅसवर तळायचे. सारख्या वर खाली करायच्या नाहीत. त्यामुळे तुटतात वा भाजत देखील नीट नाहीत.

चकली मसाला नसेल तर

लाल तिखट, मीठ, ओवा, तीळ तसेच गरम मसाला, धने पावडर व हळद, हिंग एकत्र करून तुम्ही घरीच कमी साहित्यात चकली मसाला बनवू शकता.

ही सहा महिने सर्व डाळीयुक्त पौष्टीक चकली भाजणी दिवाळीला तर ट्राय कराच पण इतर दिवशीही ट्राय करू शकता. ही रेसिपी नक्की करा.

First published:

Tags: Diwali 2021, Diwali Food, Diwali-celebrations