Home /News /lifestyle /

डोकेदुखी असो वा अंगदुखी, आता Painkiller खाणं सोडा; फक्त हे फळ खाऊन दूर होतील वेदना

डोकेदुखी असो वा अंगदुखी, आता Painkiller खाणं सोडा; फक्त हे फळ खाऊन दूर होतील वेदना

हे फळ एक नैसर्गिक वेदनाशामक आहे.

मुंबई, 29 ऑक्टोबर :  डोकेदुखी, पाठदुखी, कंबरदुखी किंवा शरीराच्या कोणत्याही भागात वेदना झाल्या की आपण सर्वात आधी पेनकिलर (Painkiller) म्हणजे वेदनाशामक औषध घेतो (Painkiller medicine). पण सतत असं वेदनाशामक औषध घेतल्याने त्याचे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. आता याच पेनकिलरला उत्तम पर्याय आहे ते एक फळ (Painkiller fruit). जे नैसर्गिक वेदनाशामक आहे. शरीराच्या कोणत्याही वेदना या फळामुळे दूर होतात हे संशोधनातही सिद्ध झालं आहे. आरोग्यासाठी फळं (Fruit) सर्वांत उत्तम असतात. फळं खाण्यामुळे शरीरातली ऊर्जेची पातळी आणि आरोग्य उत्तम राहतं. पण एक फळ असं आहे, जे वेदनाशामक आहे. ते फळ म्हणजे हिमालयन अंजीर (Anjeer).  हिमालयन अंजीर उत्तराखंडच्या कुमाऊं जिल्ह्यात 'बेडू' (Bedu Fruit) या नावाने ओळखलं जातं (Benefits of Anjeer). अ‍ॅस्पिरिन (Aspirin) आणि डायक्लोफेनाक (Diclofenac) या गोळ्यांच्या ऐवजी हिमालयन अंजीर एक उत्तम पर्याय असल्याचं संशोधनात समोर आले आहे. उंदरांवर (Rat) केलेल्या प्रयोगातून हे सिद्ध झालं आहे. हे वाचा - कोरफड आरोग्यदायी म्हणून सारखी पोटात घेत असाल तर सावधान! होऊ शकतो उलटा परिणाम पंजाबमधल्या लवली प्रोफेशनल इन्स्टिट्यूटमधल्या (LPU) संशोधकांच्या नेतृत्वाखालच्या आंतरराष्ट्रीय टीमने हे संशोधन केलं आहे. हे संशोधन करणाऱ्यांमध्ये LPU व्यतिरिक्त, उत्तराखंडमधलं कुमाऊं विद्यापीठ, गुजरातमधलं गणपत विद्यापीठ, ग्रेटर नोएडामधलं शारदा विद्यापीठ, इटलीमधलं मेसिना विद्यापीठ, इराणमधली तेहरान युनिव्हर्सिटी ऑफ मेडिकल सायन्सेस आणि शाहिद बहिश्ती विद्यापीठातल्या संशोधकांचा समावेश होता. हिमालयीन प्रदेशात आढळणाऱ्या या लोकप्रिय फळाचे इतर अनेक वैद्यकीय फायदे असल्याचं संशोधनात आढळून आलं आहे. संशोधकांनी हिमालयन अंजीराच्या अर्काच्या प्रभावावर तीन वर्षे अभ्यास केला. 'प्लांट्स' जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनाच्या अहवालानुसार, हिमालयन अंजीर येत्या काळात नैसर्गिक वेदनाशामक म्हणून खूप प्रभावी उपाय ठरू शकतो. ग्रामीण भागामध्ये या फळाचा पाठदुखीवर उपचार करण्यासाठी वापर केला जातो. असे पीटीआय या वृत्तसंस्थेशी बोलताना एलपीयूचे सहायक प्राध्यापक देवेश तिवारी यांनी सांगितलं. हे वाचा - माहिती आहे का? तुम्हाला हँडसम बनवणारी तुम्हाला दाढी भयंकर आजारापासूनही वाचवते डोकेदुखी, अंगदुखी, पाठदुखी, गुडघेदुखी किंवा गॅसमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर आपण अनेकदा औषधं घेतो. या औषधांमुळे आपल्याला तात्काळ आराम मिळतो. मात्र याचे अनेक दुष्परिणामदेखील होतात. अशा परिस्थितीमध्ये आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करण्याचा सल्ला डॉक्टर देतात. म्हणजे डोकेदुखी किंवा अंगदुखीवर मोहरीच्या तेलाचा मसाज केल्यास फायदा होतो. तसंच पोटदुखी असेल, तर ओवा आणि काळ्या मिठाचं पाणी पिण्यास सांगितलं जातं. आता अंजरी हे नैसर्गिक वेदनाशामक म्हणून उत्तम पर्याय ठरू शकतं.
First published:

Tags: Health, Home remedies, Lifestyle, Pain

पुढील बातम्या