प्राचीन भारतीय सुंदरतेची रहस्य; 'या' पाच गोष्टींनी खुलवा तुमचं सौंदर्य

प्राचीन भारतीय सुंदरतेची रहस्य; 'या' पाच गोष्टींनी खुलवा तुमचं सौंदर्य

आजच्या काळात महिला आपले सौंदर्य वाढविण्यासाठी ब्युटी पार्लरमध्ये जातात. पण पूर्वीच्या काळी स्त्रिया स्वयंपाकघरातील काही वस्तू मिसळून सौंदर्यप्रसाधने बनवायच्या.

  • Share this:

मुंबई, 13 फेब्रुवारी : महिला सुंदर दिसण्यासाठी अनेक ब्युटी प्रॉडक्ट्चा (Beauty Product) वापर करत असतात. यामध्ये चेहऱ्याच्या विविध क्रीमचा देखील समावेश असतो. सुंदर दिसण्यासाठी अनेक महिला ब्युटी पार्लरमध्येही (Beauty parlour) जात असतात. परंतु घरच्याघरी देखील आपलं सौंदर्य खुलवण्यासाठी अनेक वस्तूंचा वापर करता येऊ शकतो. काही घरगुती पद्धती असून या मदतीने तुम्ही ब्युटी पार्लरमध्ये न जाता सौंदर्य वाढवू शकता. प्राचीन काळापासून चालत असलेल्या या वस्तूंच्या आणि पद्धतींच्या मदतीनं घरच्याघरी सुंदर दिसू शकता.

दूध -

जुन्या काळात नवीन विवाहित नवरीला कच्च्या दुधाची (Milk) अंघोळ घालत असतं. कच्या दुधामध्ये हळद टाकून त्याची अंघोळ नवरीला करायला सांगत असत. यामुळे त्वचेवरील बंद झालेली छिद्र खुली होऊन नैसर्गिक पद्धतीनं चेहऱ्यावरील ग्लो वाढू लागतो. प्राचीन काळातील ही पद्धत आजही अनेक ठिकाणी वापरली जाते.

केसर -

चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्यासाठी केसर (Saffron) खूपच फायदेशीर आहे. दुधामध्ये केसर टाकून वापरल्यास खूप फायदा होतो. चेहऱ्यावरील टॅन दूर करण्यासाठी दूध, चंदन आणि केसर एकत्र लावणं फायदेशीर आहे. पपईमध्ये मध आणि केसर एकत्र करून लावल्यास चेहऱ्यावरील डेड स्किन कमी होते. याचबरोबर ढिल्या झालेल्या त्वचेसाठी केसर लिंबू, मध आणि बदाम एकत्र करून लावावे.

(वाचा - मी प्रेमात तर पडले नाही ना? इथं मिळेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर)

हळद -

मसाल्यांप्रमाणेच ब्युटी प्रॉडक्टमध्ये देखील हळदीचा (Turmeric) वापर होतो. चेहऱ्यावरील काळे डाग आणि अनेक गोष्टींमध्ये हळदीचा वापर होतो. चंदन, दूध, मलई आणि मध एकत्रित करून याचा फेसपॅक चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावर ग्लो वाढवण्यासाठी देखील हळद खूप फायदेशीर आहे.

मोहरी -

मोहरीची पावडर (Mustard) आणि तेल चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावर पडलेल्या टॅनसाठी मोहरीचं उटणं खूपच लाभदायक आहे. औषधप्रमाणे हे काम करत असून त्वचा तजेलदार होण्यासाठी देखील मोहरी खूप फायदेशीर आहे.

हे देखील वाचा -   Sexual Wellness : EX पार्टनरसोबत सेक्स करण्याची इच्छा का होते?

चंदन -

हळद आणि दुधाबरोबर चंदनाचा (Sandalwood) वापर चेहऱ्यासाठी खूप फायदेशीर आहे. चेहऱ्यावरील मुरूम कमी करण्यासाठी चंदनाचा लेप खूपच फायदेशीर आहे. चेहरा थंड राहण्यासाठी देखील चंदनाचा वापर केला जातो.

(Disclaimer: या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. News18 Lokmat याची पुष्टी करत नाही. या गोष्टी अंमलात आणण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क करा.)

Published by: Aditya Thube
First published: February 13, 2021, 11:03 AM IST

ताज्या बातम्या