प्रश्न : मला नाकारणाऱ्या माझ्या एक्स-बाॅयफ्रेंडसोबत सेक्स करण्याची मला इच्छा का होते?
उत्तर : ज्याच्यासोबत तुम्ही तुमच्या अमूल्य अशा भावना शेअर केल्यात त्या एक्स बॅायफ्रेंडविषयी असं वाटणं नैसर्गिक आहे. प्रेमापासून सेक्स वेगळे काढणं हे नेहमीच सोपं नसतं. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदारासमवेत जिव्हाळ्याचे क्षण शेअर करता, तेव्हा ते कुठेतरी तुमच्या भावनांशी जोडले गेलेले असतात. ही बाब चांगली म्हणता येईल की तुम्ही किमान कबूल करत आहात की तुम्हाला अद्यापही पूर्वीच्या जोडीदारासोबत सेक्स करण्याची इच्छा आहे.
तुम्ही मानसिक आणि भावनिकदृष्टया त्या नात्यात आहात का किंवा फक्त तुमचे मन त्या नात्यात गुंतले आहे, हे पाहण्याची गरज आहे. तुम्ही तुमच्या बाॅयफ्रेंडसोबत असलेले संबंध कसे तोडले यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. ब्रेकअपनंतर नेहमीच भावनिक दुःखाचा सामना करावा लागतो. तुम्हाला तुमच्या बाॅयफ्रेण्डने नाकारल्यानंतर तुम्ही कदाचित ही बाब स्वतःची किंमत नसल्याच्या कारणाशी जोडत आहात, पण तशा तुम्ही प्रत्यक्षात नसाव्यात. कमी स्वाभिमान कधीकधी लोकांना त्या एकाच व्यक्तीशी सेक्स करण्याची इच्छा निर्माण करतो, ज्याने त्यांना नाकारलेले असते. अशा व्यक्ती त्या परिस्थितीत अधिक आकर्षक होतात. त्यामुळे अशा कल्पना डोक्यात न घेता पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
हे वाचा - 'मी सर्वकाही करते तो काहीच नाही; नवऱ्याचा पुरुषार्थ न दुखावता त्याला कसं सांगू?'
तसंच दुसरं कारण असू शकतं की, तुम्ही त्या नात्यातून अजून बाहेर आलेला नाहीत. तुम्हाला तुमच्या एक्स बाॅयफ्रेंडसोबत सेक्स करावंसं वाटण्याच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे तुम्ही दोघांनी शेअर केलेले ते जिव्हाळ्याचे क्षण आता गमावले आहेत. त्यामुळे आता पुढे जाण्यासाठी, सक्षम होण्यासाठी मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला पाहिजे. अशावेळी नवीन लोकांना भेटणं आणि आपल्या जवळच्या मित्रांकडे भावना व्यक्त करणं नेहमीच फायद्याचं ठरते. पुन्हा एक्स बाॅयफ्रेण्डशी संपर्क साधून पुन्हा पुढे जाता येईल, त्याच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करता येईल, असं तुम्हाला कधीतरी वाटू शकते. परंतु यामुळे ब्रेकअपच्या प्रक्रियेस विलंब होतो आणि शेवटी आपणच अधिक दुखावलो, हरलो असं वाटतं. त्यामुळे या भावानांचा तुम्ही स्वीकार केला पाहिजे. याबाबत विश्वासू लोकं आणि काऊन्सिलरशी बोललं पाहिजे. त्यानंतर एक्स बाॅयफ्रेंडकडे सेक्स किंवा मैत्रीचा प्रस्ताव परत घेऊन जाण्याचा विचार करण्याऐवजी स्वतःवरच काम करण्याकडे लक्ष केंद्रीत केलं पाहिजे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.