मुंबई, 4 फेब्रुवारी : वयाच्या 40 वर्षांनंतर बहुतेक महिलांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्या दिसू लागतात. अशा परिस्थितीत महिलांनी काही अत्यावश्यक सप्लिमेंट्स घेणे आवश्यक ठरते. आहारात व्हिटॅमिन बी 12, कॅल्शियम आणि ओमेगा 3 फॅटी ऍसिडस् समृध्द असलेल्या गोष्टींचा समावेश करून, तुम्ही हृदयविकाराचा झटका, स्तनाचा कर्करोग आणि स्ट्रोक यांसारख्या अनेक गंभीर आजारांपासून दूर राहू शकता. त्याचबरोबर स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी देखील ठेवू शकता. वाढत्या वयाबरोबर आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. विशेषत: महिलांमध्ये वृद्धत्वाबरोबर त्यांची ऊर्जा पातळीही कमी होऊ लागते. त्याचबरोबर महिलांनी आरोग्य सेवेचे योग्य नियम न पाळल्यास अनेक गंभीर आजारांनाही बळी पडू शकता. अशा परिस्थितीत जर तुमचे वय 40 वर्षांपेक्षा जास्त असेल तर आहारात 5 आवश्यक पूरक पदार्थांचा समावेश करून तुम्ही नेहमीच निरोगी राहू शकता.
Health Tips : व्हायरल ताप असल्यास घेऊ नका ताण; ठरू शकतं हार्ट अॅटॅकचं कारण!40 वर्षांवरील बहुतेक महिलांच्या शरीरात पोषणाची कमतरता असते. त्यामुळे महिलांचे स्नायू कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत महिलांना पाठदुखी, गुडघेदुखी किंवा हाडदुखीच्या समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र ओन्ली माय हेल्थच्यामते, काही सप्लिमेंट्सना आहाराचा भाग बनवून तुम्ही शरीरातील पोषक तत्वांची कमतरता तर पूर्ण करू शकताच. त्याचबरोबर 40 नंतरही स्वतःला तंदुरुस्त आणि निरोगी ठेवू शकता.
व्हिटॅमिन बी 12 व्हिटॅमिन बी12 खाल्ल्याने शरीरातील रक्ताभिसरण चांगले राहते आणि मेंदूचे कार्यही चांगले राहते. याशिवाय पोटातील ऍसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी व्हिटॅमिन बी12 असलेल्या गोष्टी खाणे उत्तम. यासाठी महिला अंडी, मासे आणि दुग्धजन्य पदार्थांचे सेवन करून शरीरातील व्हिटॅमिन बी12 ची कमतरता पूर्ण करू शकतात. कॅल्शियम 40 वर्षांनंतर शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होऊ लागतात. अशा परिस्थितीत दूध आणि चीज यांसारख्या कॅल्शियमयुक्त गोष्टींचा आहारात समावेश करून तुम्ही हाडे मजबूत करण्यासोबतच हृदय निरोगी आणि स्नायू मजबूत ठेवू शकता. पण लक्षात ठेवा की, कॅल्शियमयुक्त गोष्टींचे जास्त सेवन केल्याने देखील हृदयविकार होऊ शकतो. म्हणूनच कॅल्शियमचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे चांगले. मॅग्नेशियम मॅग्नेशियम हा खनिजांचा उत्तम स्रोत मानला जातो. अशा परिस्थितीत मॅग्नेशियमयुक्त आहार घेतल्यास शरीरातील रक्तातील साखरेची पातळी आणि रक्तदाब नियंत्रणात राहतो. त्याचवेळी पाचन तंत्र मजबूत करण्यासाठी आणि गॅस किंवा ऍसिडिटीच्या समस्येपासून मुक्त होण्यासाठी मॅग्नेशियम युक्त गोष्टींचे सेवन करणे चांगले आहे. व्हिटॅमिन डी शरीरात व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मधुमेह, स्तनाचा कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका असतो. तसेच व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शियम शोषण्यास देखील मदत करते. अशा परिस्थितीत व्हिटॅमिन डीचे सेवन करण्यासाठी मासे, दुग्धजन्य पदार्थ, धान्ये आणि तृणधान्ये यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो. सिझेरियन प्रसूतींची संख्या का वाढतेय? जाणून घ्या नेमकी कारणं व ते रोखण्यासाठी तज्ज्ञांकडून मार्गदर्शन ओमेगा-3 फॅटी ऍसिड चाळीशीनंतर स्त्रियांना हृदयविकार, सांधेदुखी, उच्च कोलेस्ट्रॉल पातळी आणि पक्षाघाताचा धोका जास्त असतो. अशा स्थितीत ओमेगा ३ फॅटी अॅसिड खाल्ल्याने या सर्व आजारांचा धोका कमी होतो. त्यामुळे आहारात ओमेगा ३ फॅटी अॅसिडचा समावेश करून तुम्ही अनेक गंभीर आजारांवरही मात करू शकता. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)