मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

रात्री गाढ झोपलेल्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध; दुसऱ्या दिवशीच महिलेला भोगावा लागला असा परिणाम

रात्री गाढ झोपलेल्या नवऱ्यासोबत शारीरिक संबंध; दुसऱ्या दिवशीच महिलेला भोगावा लागला असा परिणाम

पतीच्या परवानगीशिवाय तो झोपेत असताना त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं महिलेला महागात पडलं.

पतीच्या परवानगीशिवाय तो झोपेत असताना त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं महिलेला महागात पडलं.

पतीच्या परवानगीशिवाय तो झोपेत असताना त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं महिलेला महागात पडलं.

लंडन, 30 डिसेंबर : कोणत्याही नात्यात (Relationship) विश्वास हा महत्त्वाचा असतो. लग्नासारख्या (Marriage) अत्यंत महत्त्वाच्या आणि नाजूक नात्यात तर पती-पत्नीचा (Husband-Wife) एकमेकांप्रती असलेला विश्वास, प्रेम अत्यंत आवश्यक असतं. त्याचप्रमाणे कोणत्याही निर्णयात पती-पत्नीची संमती सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. घरातल्या साध्या साध्या गोष्टींपासून ते मोठ्या व्यवहारांचे निर्णय घेण्यात, तसंच परस्पर नातेसंबंध दृढ करण्यासाठी ती गोष्ट आवश्यक असते. पती-पत्नीच्या नात्यात एकमेकांबद्दल आदर आणि संमती दोन्ही असणं आवश्यक असते. तरच हे नातं फुलतं, मजबूत होतं; मात्र काही वेळा एक जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला गृहीत धरतो आणि निर्णय घेतो. अशा वेळी या नात्याला तडा जाऊ शकतो. याचाच अनुभव एका विवाहित महिलेला आला आहे. तिनं झोपेत असलेल्या पतीशी सेक्स केलं आणि त्याचा तिला भयंकर परिणाम भोगावा लागला.

28 वर्षांच्या एका नवविवाहित महिलेनं (Married Woman) आपला अनुभव शेअर केला आहे. तिनं सांगितलं, की 'आम्ही दोघं 28 वर्षांचे आहोत आणि लग्नालाही फक्त एक वर्ष झालं आहे. माझा पती ऑफिसमधून आल्यावर खूप थकलेला असतो आणि रात्री सेक्समध्येही तो काही रस दाखवत नाही. त्यामुळे मी कंटाळले होते. म्हणून मी एका रात्री एक मोठं धाडस केलं. पती झोपेत असताना त्याच्याशी सेक्स केला. तो खूप थकला होता. म्हणून मी त्याला जागं केलं नाही; मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी मी त्याला रात्री घडलेला सर्व प्रसंग सांगितला. तेव्हा तो खूपच संतापला; काल रात्री माझी संमती नसताना तू माझ्यासोबत सेक्स केलास याचाच अर्थ तू माझ्यावर बलात्कार केला आहेस, असंही त्यानं सुनावलं.'

हे वाचा - हद्दच झाली! पार्टीत पोटभर जेवली GF म्हणून BF ने...; तरुणीने मांडली विचित्र व्यथा

तक्रार घेऊन पोलिसांकडे तक्रार केल्यास पोलीसही आपल्याला पूर्ण पाठिंबा देतील, असंही पतीनं स्पष्ट केलं. पतीनं त्याच्या संमतीविना घडलेली ही गोष्ट चुकीची असल्याचं लक्षात आणून दिल्यावर पत्नीलाही त्याचं म्हणणं पटलं. कोणत्याही नात्यात संमती सर्वांत महत्त्वाची असते आणि तिने या कृत्यासाठी पतीची संमती घेतली नाही, ही मोठी चूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं आणि तिनं आपली चूक कबूल केली.

झी न्यूज हिंदीने दिलेल्या वृत्तानुसार 'द सन' वेबसाइटवरच्या 'डियर डाईड्री' (Dear Deidre) मालिकेत या महिलेनं आपला हा अनुभव सांगितला आहे. नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्यातल्या समस्या जाणून घेण्यासाठी 'द सन' वेबसाइटनं (The Sun Website) ही मालिका सुरू केली असून, नागरिक त्यांच्या आयुष्यातले असे काही क्षण, घटना त्यात शेअर करत आहेत.

हे वाचा - Alexa ने 10 वर्षांच्या मुलीला दिलं जीवघेणं चॅलेज, आईमुळे वाचला लेकीचा जीव!

कोणी दारूच्या नशेत, बेशुद्धावस्थेत असेल तर त्याच्यासोबत असं वागू नये. तुमचा नवरा पोलिसात गेला नाही हे तुमचं सुदैव आहे; अन्यथा तुम्ही अडचणीत आला असतात, असा सल्ला या महिलेला देण्यात आला. या कथेतून इतरांनाही नात्यात परस्परसंमती (Consent) किती महत्त्वाची असते याचा धडा मिळाला आहे.

First published:

Tags: Couple, Relationship