मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alexa ने 10 वर्षांच्या मुलीला दिलं जीवघेणं चॅलेज, आईमुळे वाचला लेकीचा जीव!

Alexa ने 10 वर्षांच्या मुलीला दिलं जीवघेणं चॅलेज, आईमुळे वाचला लेकीचा जीव!

 इलेक्ट्रिक प्लगच्या दोन टोकांमध्ये नाणं लावून नाण्याला स्पर्श करण्याचं चॅलेंज (Penny Challenge) देण्यात येतं.

इलेक्ट्रिक प्लगच्या दोन टोकांमध्ये नाणं लावून नाण्याला स्पर्श करण्याचं चॅलेंज (Penny Challenge) देण्यात येतं.

इलेक्ट्रिक प्लगच्या दोन टोकांमध्ये नाणं लावून नाण्याला स्पर्श करण्याचं चॅलेंज (Penny Challenge) देण्यात येतं.

  मुंबई, 29 डिसेंबर : जगातली सर्वांत मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या Amazon ने आपलं ‘अ‍ॅलेक्सा’ हे डिजिटल असिस्टंट प्रॉडक्ट (Voice Assistant Alexa) अधिक स्मार्ट बनवलं आहे. अ‍ॅलेक्सा विविध भाषांमध्ये उपलब्ध करण्यात येत आहे. (Amazon) ‘अ‍ॅलेक्सा’ (Voice Assistant Alexa) नेहमीच चर्चेत असते; मात्र या वेळी अ‍ॅलेक्सा चर्चेत येण्याचं कारण 10 वर्षांची एक मुलगी आहे. एका 10 वर्षीय मुलीचा जीव अ‍ॅलेक्साने धोक्यात टाकल्याची घटना घडली आहे.

  10 वर्षीय एका मुलीला अ‍ॅलेक्साने धोकादायक 'पेनी चॅलेंज' करायला सांगितलं. पेनी चॅलेंज 2020 मध्ये टिकटॉकवर आलं होतं. त्यात इलेक्ट्रिक प्लगच्या दोन टोकांमध्ये नाणं लावून नाण्याला स्पर्श करण्याचं चॅलेंज (Penny Challenge) देण्यात येतं. 'झी न्यूज हिंदी'ने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

  अमेरिकेत राहणाऱ्या या 10 वर्षीय मुलीची आई क्रिस्टिन लिव्हडाहल यांनी ट्विटरवर या घटनेची माहिती दिली. त्यांच्या मुलीने अ‍ॅलेक्साला या चॅलेंजबद्दल विचारल्यानंतर अ‍ॅलेक्साने सांगितलं, की मोबाइल चार्जर प्लगमध्ये अर्धं लावावा आणि त्याच्या मध्यभागी एक नाणं ठेवून त्याला स्पर्श करावा. हे ऐकताच क्रिस्टिन लिव्हडाहल यांनी आपल्या मुलीला हे चॅलेंज करण्यापासून थांबवलं. अ‍ॅलेक्सालाही नकार दिला. तसंच त्यांनी ही संपूर्ण घटना टि्वटरवर शेअर केली. क्रिस्टिन लिव्हडाहल यांचे टि्वट व्हायरल झाल्यानंतर याची दखल ‘अ‍ॅमेझॉन’ कंपनीकडून घेण्यात आली असून, ‘अ‍ॅलेक्सा’ सॉफ्टवेअर अपडेट करण्यात आलं आहे.

  (प्रेमाच्या मॅटरमध्ये गजाआड गेला, बाहेर आल्यावर 'ती'च्या विरहात घेतला गळफास)

  भविष्यात अशा प्रकारच्या धोकादायक गोष्टी घडू नयेत, म्हणून अ‍ॅलेक्सा अपडेट करण्यात आल्याचं अ‍ॅमेझॉनने बीबीसीशी बोलताना सांगितलं. ग्राहकांचा विश्वास आमच्या केंद्रस्थानी असून, ग्राहकांना अचूक आणि उपयुक्त माहिती प्रदान करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. ही समस्या निदर्शनास आल्यानंतर लगेचच आम्ही ती दुरुस्त करण्यासाठी तातडीने पावलं उचलल्याचं अ‍ॅमेझॉनने म्हटलं आहे.

  (जय दुधाणे म्हणतो, 'आविष्कार दारव्हेकर कलिंगड तर स्नेहा वाघ माझ्यासाठी..')

  'द पेनी चॅलेंज' धोकादायक असून, सुमारे एका वर्षापूर्वी टिकटॉक आणि इतर सोशल मीडिया (Social Media) वेबसाइटवर मोठ्या प्रमाणात ट्रेंडिंग होतं. अनेकांनी हा ट्रेंड फॉलो करून असे व्हिडिओ तयार केले होते. ते करताना काळजी न घेतल्यास मोठं नुकसान होऊ शकते. हे चॅलेंज करताना अनेकांना विजेचा शॉक बसल्याच्या किंवा गंभीर दुखापत झाल्याच्या आणि आग लागल्याच्या घटना घडल्या आहेत. अनेकांना विजेचा जोरदार धक्का (Electric socket) लागल्याने हात गमवावे लागले आहेत. त्यामुळे या प्रकारचं चॅलेंज स्वीकारून आपला जीव धोक्यात घालू नका, असं आवाहन करण्यात आलं आहे.

  First published: