मराठी बातम्या /बातम्या /Viral /हद्दच झाली! पार्टीत पोटभर जेवली गर्लफ्रेंड म्हणून बॉयफ्रेंडने...; तरुणीची विचित्र व्यथा ऐकून सर्वजण हैराण

हद्दच झाली! पार्टीत पोटभर जेवली गर्लफ्रेंड म्हणून बॉयफ्रेंडने...; तरुणीची विचित्र व्यथा ऐकून सर्वजण हैराण

डिनर पार्टीनंतर खाण्यावरून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये झाले वाद.

डिनर पार्टीनंतर खाण्यावरून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये झाले वाद.

डिनर पार्टीनंतर खाण्यावरून गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंडमध्ये झाले वाद.

 लंडन, 30 डिसेंबर : नवरा-बायको असो किंवा बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड (Girlfriend boyfriend) या नात्यात वाद हे होतच असतात. जितकं प्रेम असतं तितकीच भांडणंही होतात. पण तरी ते एकमेकांची काळजी घेतात. विशेषतः खाण्याबाबत. आपल्या जोडीदाराला काय खायला आवडतं, कसं खायला आवडतं, काय खाल्ल्यावर त्याला त्रास होतो, त्याला काय खायला आवडत नाही याची पुरेपूर माहिती त्यांना एकमेकांना असते आणि त्याचप्रकारे त्याची काळजी घेतली जाते. पण एका बॉयफ्रेंडने तर हद्दच केली. पार्टीमध्ये गर्लफ्रेंडने पोटभर खाल्लं म्हणून असं काही केलं जे समजताच सर्वजण हैराण झाले आहेत (Girlfriend boyfriend dispute over eating) .

तरुणी तिच्या बॉयफ्रेंडसोबत डिनर पार्टीवर (Dinner Party Manners) गेली होती. तिथं तिने मनसोक्त पोटभर खाल्लं आणि दोघंही परतत असताना तिच्या बॉयफ्रेंडने तिला असं काही सांगितलं, ज्याचा तिने विचारही केला नसेल. या तरुणीने आपली विचित्र व्यथा सोशल मीडियावर मांडली आहे.

तरुणीने आपल्या पोस्टमध्ये सांगितलं, गेल्या सात महिन्यांपासून ज्या तरुणासोबत रिलेशनशिपमध्ये आहे, त्याने आपल्या घरी फॅमिली डिनरसाठी बोलावलं. जेव्हा ती त्याच्या घरी जेवायला गेली तेव्हा तिने सर्व पदार्थांची चव चाखली आणि भरपेट खाल्लं. त्यावेळी तिच्या बॉयफ्रेंडने तिच्याकडे विचित्र नजरेने पाहू लागला.

हे वाचा - दोन गर्भाशय, दोन्हीत एकाच वेळी बाळ; प्रेग्नंट महिलेचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही शॉक

जसे दोघंही डिनर पार्टीहून परतले तेव्हा तिच्या बॉयफ्रेंडने तिला खाण्यावरून खूप सुनावलं. तुला खाण्याचे मॅनर्स नाहीत. डिनर पार्टीत तिने इतकं खाल्लं की मला लाज वाटू लागली, असं तो तिला म्हणाला.

आपल्या बॉयफ्रेंडचं असं म्हणणं ऐकून तिलाही आश्चर्य वाटलं. तिने आपल्या या सवयीबाबत त्याच्यासमोर स्पष्टीकरण दिलं.  कुणाच्याही घरी गेल्यानंतर ताटातील संपूर्ण अन्न संपवावं, जेणेकरून समोरच्याला वाईट वाटणार नाही असं तिला नेहमी सांगण्यात आल्याचं ती म्हणाली. पण असं सर्वकाही खाणं म्हणजे चांगलं नाही, दुसऱ्याला लाज वाटेल असं कृत्य आहे, असं तिचा बॉयफ्रेंड म्हणाला.

हे वाचा - श्रीमंतीला वैतागला तरुण; कोट्यवधींचा मालक झाल्यानंतर म्हणे, 'नोकरीच बरी कारण...'

तरुणीने रेडिट साईटवर आपला हा अनुभव मांडला. त्यावेळी बहुतेकांनी तिला अशा मुलाला सोडण्याचाच सल्ला दिला आहे.

First published:

Tags: Boyfriend, Couple, Girlfriend, Relationship, Viral, Viral news