मुंबई, 30 नोव्हेंबर : महिलांच्या आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण महिलांचे शरीर खूप नाजूक आणि तितकेच गुंतागुंतीचे असते. त्यामुळे महिलांनी खाण्यापिण्यापासून काही सवयीपर्यंत व्यवस्थित काळजी घेणे अवश्यक आहे. अशीच गोष्ट असते ती म्हणजे ब्रेस्टची काळजी घेणे. हल्ली ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण भारतात वाढत आहे. त्यामुळे महिलांनी ब्रेस्ट बाबतीत काही चुका कारण प्रकर्षाने टाळलं पाहिजे.
ऑब्सटेट्रिशियन-गायनेकोलॉजिस्ट (OBGYN), इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट डॉक्टर तनुश्री पांडे पाडगावकर यांनी त्यांच्या इंस्टाग्राम अकाउंटवर ब्रेस्ट केअरशी संबंधित माहिती शेअर केली आहे. महिलांनी आपल्या ब्रेस्टची काळजी कशी घ्यावी आणि त्यांच्या ब्रेस्टशी संबंधित कोणत्या चुका करू नये हे हे डॉ. तनुश्री यांनी त्यांच्या पोस्टद्वारे सांगितले आहे.
PCOS च्या समस्येने त्रस्त असाल तर ही फळं नक्की खा; अन्यथा गर्भधारणेत येऊ शकते अडचण
ब्रेस्ट साईज
प्रत्येक महिलेच्या ब्रेस्टची साईज वेगवेगळी असते. डॉक्टर तनुश्री यांच्यामते, बऱ्याचदा स्त्रिया आपल्या ब्रेस्टच्या साईजचा खूप विचार करतात. मात्र ही सवय चुकीची आहे. तुमच्या ब्रेस्टची साईज जी काही असेल त्याबद्दलच तुम्हाला आत्मविश्वास असला पाहिजे. कमी जास्त साईज का आहे किंवा ब्रेस्टची साईज एवढीच असायला हवी असा विचार करणे चुकीचे आहे.
दर महिन्याला ब्रेस्ट चेकअप
जसे आपण नियमित शरीराचे चेकअप करत असतो. त्याचप्रमाणे ब्रेस्टला देखील दर महिन्याला तपासणी आवश्यक असते. ब्रेस्टमध्ये काही त्रास आसल्यास तपासणी दरम्यान तुम्हाला त्याचे कारण कळू शकते. तसेच ब्रेस्ट कॅन्सरशी संबंधित काही त्रास असल्याचे त्याचेही निदान होऊ शकते. कारण ब्रेस्ट कॅन्सरची सुरुवातीची लक्षणे स्व-स्तन तपासणीद्वारे सहज शोधता येतात.
योग्य साईजची ब्रा
ब्रेस्ट चांगले आणि हेल्दी राहण्यासाठी योग्य साईजची ब्रा घालणे खूप आवश्यक असते. यामुळे ब्रेस्टला आधार मिळतो आणि त्यांना काहीही नुकसान होत नाही. त्यामुळे योग्य साईजची ब्रा निवडा, जास्त सैल किंवा जास्त घट्ट ब्रा निवडू नका. यामुळे ब्रेस्टच्या स्नायूंमध्येही ताण पडू शकतो. त्याचप्रमाणे थोडावेळ ब्रा काढा आणि ब्रेस्टला आराम देणंही आवश्यक आहे.
Intimate Hygiene : कॅन्सरला कारणीभूत ठरू शकते सॅनिटरी नॅपकिन; असे निवडा योग्य पॅड
बाजारात मिळणाऱ्या वेगवेगळ्या क्रीम्स
बऱ्याचदा मुलींना आपल्या ब्रेस्टच्या साईज किंवा रंगांविषयी खूप तक्रारी असतात आणि मग ते सुधारण्यासाठी त्या वेगवेगळ्या क्रिम्सचा वापर करतात. ब्रेस्टचा रंग बदलण्यासाठी लायटनिंग क्रीम्स, ब्रेस्ट टाईट करण्यासाठी टायटनिंग क्रीम्स. मात्र यांचा वापर करणे खूप चुकीचे आहे. त्यांचा आपल्या ब्रेस्टला काहीही फायदा होत नाही. उलट त्याचे काहीवेळा दुष्परिणाम होण्याची शक्यता असते.
View this post on Instagram
(सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Breast cancer, Health, Health Tips, Lifestyle, Women