मुंबई, 26 नोव्हेंबर : मासिक पाळी महिलांच्या आयुष्यातील अविभाज्य घटना असते. त्यादरम्यान महिलांना खूप त्रास सहन करावा लागतो. महिलांना असह्य वेदना, पोटदुखी आणि मूड बदलणे सुरू होते. या काळात प्रत्येक महिलेने काही खबरदारी घेणे आवश्यक असते. या काळात कपड्यांमधील रक्ताचे डाग टाळण्यासाठी सॅनिटरी पॅड वापरणे हा एक चांगला पर्याय आहे.
मात्र हे सर्वच सॅनिटरी नॅपकिन्स सुरक्षित असतात का? सॅनिटरी नॅपकिन्सबद्दलचे एक संशोधन आजतकच्या वृत्तामध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. यानुसार योग्य आणि सुरक्षित सॅनिटरी नॅपकिन न वापरल्यास महिलांना कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करावा लागू शकतो. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला योग्य सॅनिटरी नॅपकिन कसे निवडावे याबद्दल महिती देणार आहोत.
Periods : पाळीदरम्यान तुम्हीही करता या चुका? वेळीच न थांबवल्यास येऊ शकतो हार्ट अटॅक
दिल्लीस्थित एनजीओ टॉक्सिक्स लिंकने एक अभ्यास आयोजित केला, हा अभ्यास आंतरराष्ट्रीय प्रदूषण निर्मूलन नेटवर्कच्या चाचणीचा एक भाग आहे. या अभ्यासात भारतात विकल्या जाणार्या 10 ब्रँडच्या सॅनिटरी नॅपकिन्सच्या उत्पादनांचा समावेश करण्यात आला होता. यामध्ये संशोधकांना सर्व नमुन्यांमध्ये phthalates आणि volatile organic compounds (VOCs) चे अंश आढळले. हे दोन्ही दूषित घटक कर्करोगाच्या पेशी निर्माण करण्यास सक्षम आहेत. ही चिंतेची बाब आहे. हे संशोधन 'मेन्स्ट्रुअल वेस्ट 2022' या अहवालात प्रसिद्ध करण्यात आले आहे.
त्वचेवर Phthalates रासायनिक संपर्कामुळे कर्करोग, मधुमेह आणि हृदयरोग होतो आणि प्रजननक्षमतेवर परिणाम होतो. तसेच VOCs च्या प्रदर्शनामुळे मानसिक क्षमतेवर परिणाम होतो. यामुळे दमा आणि काही प्रकारचे कर्करोग देखील होऊ शकतात. याशिवाय त्याचा प्रजनन क्षमतेवरही परिणाम होतो. रिसर्च टीमने सांगितले की खरं तर, या गंभीर रसायनांचा योनीच्या त्वचेवर प्रभाव स्त्रीच्या शरीराच्या इतर भागांच्या त्वचेच्या तुलनेत जास्त असतो. त्यामुळे हा धोका अधिकच वाढतो.
असे निवडा योग्य सॅनिटरी नॅपकिन्स
- आपण सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करताना बऱ्याचदा केवळ ब्रॅण्डच्या नावावरून ते निवडतो. मात्र भारतात बनवलेल्या मोठ्या कंपन्यांच्या सॅनिटरी नॅपकिन्समध्येही घातक रसायने असल्याचे या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. म्हणूनच महिलांनी केवळ रसायनमुक्त सेंद्रिय सॅनिटरी पॅड (Organic Sanitary Pad) खरेदी करावेत, जे बायोडिग्रेडेबल असल्याने पर्यावरणासाठीही चांगले आहेत. यासोबतच तुम्ही कॉटनचे सॅनिटरी नॅपकिन्स देखील वापरू शकता.
- अनेकदा आपण टीव्हीवर पाहून सुगंधित सॅनिटरी नॅपकिन्सच्या मोहात पडतो. मात्र हे सुगंधित सॅनिटरी नॅपकिन्स वापरणे आरोग्यस्वतही खूप धोकादायक ठरू शकतात.
- सुगंधित सॅनिटरी नॅपकिन्स जास्त काळ वापरल्याने पॅडमध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता वाढते. तसेच याच्या वरच्या थरात सुगंध निर्माण करण्यासाठी धोकादायक रसायनांचा वापर केला जातो. जे आपल्या त्वचेसाठी चांगले नसते.
वाढत्या वयासोबत मासिक पाळीत होतात हे मोठे बदल, या संकेतांकडे करू नका दुर्लक्ष
- सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करताना सिंथेटिक पॅड वापरणे टाळा कारण त्यांचा हार्ड आणि केमिकल असलेला बेस योनीच्या नाजूक त्वचेसाठी हानिकारक आहे. नेहमी रॅश फ्री सॅनिटरी नॅपकिन्स खरेदी करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Health Tips, Lifestyle, Periods, Women