PCOS ची काही सामान्य लक्षणे म्हणजे अनियमित मासिक पाळी येणे किंवा मासिक पाळीचा अभाव, पुरळ, केसांची अतिरिक्त वाढ, वजन वाढणे, तेलकट त्वचा. ही फळं तुमची मदत करतील.
नाशपाती : E Times मध्ये दिलेल्या माहितीनुसार, नाशपातीचाही गलयसेमिक इंडेक्स कमी आहे आणि फायबरचे प्रमाण जास्त आहे. हे तुमचे वजन कमी करण्यासाठी योग्य आहे.
सफरचंद : सफरचंदाचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो आणि ते इंसुलिन प्रतिरोधक क्षमता व्यवस्थापित करण्यासाठी उत्तम असतात. सफरचंद कमी कॅलरी आणि स्वादिष्ट चवीचा परिपूर्ण नाश्ता आहे.
संत्री : संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणावर असते. त्यात असलेल्या अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरमुळे तुमच्या रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही आणि हळूहळू रक्तातील साखर शोषून घेते.
पीच आणि प्लम्स : या दोन्ही फळांमध्ये दाहक-विरोधी गुणधर्म आहेत, जे PCOS ने त्रस्त असलेल्या महिलांसाठी चांगले आहेत.
किवी : किवींचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी, उच्च व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई आणि पोटॅशियम असते. दुपारच्या स्नॅक्समध्ये आपण किवी खाऊ शकतो.
बेरी : ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, रास्पबेरी आणि ब्लॅकबेरी हे अँटिऑक्सिडंट्स आणि दाहक-विरोधी घटकांचे उत्तम स्त्रोत आहेत.
पपई : कच्ची किंवा पिकलेली पपई हे अँटिऑक्सिडंट्सचा एक उत्तम स्रोत आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्मांसह पीसीओएसची लक्षणे कमी करण्यात मदत करू शकते.
डाळिंब : या फळामध्ये लोहाचे प्रमाण जास्त आहे आणि ते सक्रिय अँटिऑक्सिडंट म्हणून ओळखले जाते. डाळिंब लोहाचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि जळजळ कमी करण्यासाठी उत्तम आहे.
द्राक्षे : द्राक्षांमध्ये केवळ फायबर आणि जीवनसत्त्वे नसतात तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स देखील असतात. (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)