Home /News /lifestyle /

प्रसूतीनंतर महिलांना करावा लागतो केसगळतीचा सामना, 'हे' घरगुती उपाय वापरून घ्या केसांची काळजी

प्रसूतीनंतर महिलांना करावा लागतो केसगळतीचा सामना, 'हे' घरगुती उपाय वापरून घ्या केसांची काळजी

प्रसूतीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते. ज्यामुळे केस गळू लागतात. मात्र, हा बदल काही काळासाठीच होतो आणि इस्ट्रोजेन नॉर्मल लेव्हलवर आल्यावर केस गळण्याची (Hair Fall) समस्या संपते.

  मुंबई, 04 जुलै : प्रसूतीनंतर महिलांना काही त्रासाचा सामना करावा लागतो. यातील सर्वात मोठी समस्या असते ती म्हणजे केसगळती. बाळ झाल्यानंतर महिलांना खूप मथ्या प्रमाणात आपले केस गमवावे (After Delivery Hair Fall) लागू शकतात. तुमचेही केस गळत असतील तर काही घरगुती उपायांच्या मदतीने तुम्ही ते गळणे थांबवू शकता. खरं तर, प्रसूतीनंतर शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी कमी होऊ लागते. ज्यामुळे केस गळू लागतात. मात्र, हा बदल काही काळासाठीच होतो आणि इस्ट्रोजेन नॉर्मल लेव्हलवर आल्यावर केस गळण्याची (Hair Fall) समस्या संपते. मात्र जास्त काळ ही समस्या असेल तर काही घरगुती उपायांचा (Home Remedies) वापर करून तुम्ही तुमची केसगळती थांबवू शकता. केस गळणे थांबवण्यासाठी काही घरगुती उपाय अंडी (Eggs For Hair Fall) एक अंडे घ्या आणि त्याचा पांढरा भाग काढून टाका. त्यात 3 चमचे ऑलिव्ह ऑईल टाका. आता ते केसांना आणि टाळूला चांगले लावा. यामुळे केस आणि टाळूचे पोषण होईल आणि केस मऊ आणि मजबूत होतील. हा हेअर पॅक तुम्ही अर्धा तास केसांवर ठेवा आणि नंतर थंड पाण्याने केस धुवा. दोन ते तीन वेळा वापरल्यास फरक दिसून येईल.

  फॅटी लिव्हर होऊ नये म्हणून आजपासूनच अशी घ्या काळजी; गंभीर आजाराचा धोका टळेल

  हेअर मसाज (Hair Massage) केसांना रोज मसाज केल्यास टाळूला रक्तपुरवठा वाढतो आणि केस मजबूत आणि लांब होतात. अशा परिस्थितीत दररोज पाच ते दहा मिनिटे कोमट तेलाने केसांना मसाज करा. यासाठी तुम्ही खोबरेल तेल, एरंडेल तेल इत्यादी घेऊ शकता. आवळा (Indian Gooseberry) केसांच्या पोषणासाठी आवळा खूप फायदेशीर आहे. तुम्ही त्याचा आहारात समावेश करू शकता किंवा त्याचा रस प्या. ताजा आवळाही केसांना लावू शकता. भृंगराज (False Daisy) केस गळणे थांबवण्यासाठी भृंगराज एक चमत्कारिक औषधी वनस्पती आहे. मूठभर भृंगराजची पाने घेऊन त्याची पेस्ट बनवा. आता या पेस्टमध्ये दूध घाला किंवा थेट केसांना लावा. Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम एरंडेल तेल (Caster Oil) केसांच्या वाढीसाठी आवश्यक असलेल्या ओमेगा 9 फॅटी ऍसिड एरंडेल तेलामध्ये मुबलक प्रमाणात असते. यासाठी कोमट बदाम तेल किंवा खोबरेल तेलात थोडे एरंडेल तेल मिसळून केसांना मसाज करा.
  Published by:Pooja Jagtap
  First published:

  Tags: Health Tips, Lifestyle, Woman hair

  पुढील बातम्या