मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; Blood Sugar Level राहील कंट्रोलमध्ये

Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; Blood Sugar Level राहील कंट्रोलमध्ये

साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे मधुमेहाच्या आजारात खूप (Leaves For Diabetes Control) आराम मिळतो.

साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे मधुमेहाच्या आजारात खूप (Leaves For Diabetes Control) आराम मिळतो.

साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे मधुमेहाच्या आजारात खूप (Leaves For Diabetes Control) आराम मिळतो.

नवी दिल्ली, 23 मे : मधुमेहाच्या रुग्णांना नेहमी सकस आहार घेण्याचा सल्ला दिला जातो. कारण रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहिली नाही तर त्यांचे आरोग्य बिघडू शकते आणि त्यांना इतर अनेक आजार होण्याची शक्यता असते. साखरेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आपण अनेक उपाय करतो, पण आज आम्ही तुम्हाला अशाच गोष्टींबद्दल सांगत आहोत, ज्यामुळे मधुमेहाच्या आजारात खूप (Leaves For Diabetes Control) आराम मिळतो. मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी काही नैसर्गिक उपायांची माहिती जाणून घेऊया.

ही 2 हिरवी पाने मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर -

झी न्यूजने दिलेल्या बातमीनुसार, मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवायची असेल तर आहारात आवश्यक ते बदल करावेत. यासोबतच रोज सकाळी कडुलिंब पाने आणि कढीपत्ता चावून खायला सुरुवात करा, काही दिवसात तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल. या पानांच्या सेवनाने रक्तदाबाच्या अनेक समस्यांवरही मात करता येते.

1. कढीपत्त्याचे फायदे - (Curry Leaves Benefits)

दक्षिण भारतीय पदार्थांमध्ये कढीपत्ता जास्त वापरला जातो. त्यात असलेले फायबर पचनक्रिया मंदावते, ज्यामुळे साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि इन्सुलिन (Insulin) देखील वाढते. मधुमेही रुग्ण दररोज सकाळी सुमारे 10 पाने चावू शकतात. याशिवाय कढीपत्त्याचा रसही पिऊ शकता. कढीपत्त्याचा विविध भाज्यांमध्ये आमटीमध्ये वापर करता येऊ शकतो.

हे वाचा -  Cardamom Benefits: वेलची खाण्याचे इतके फायदे अनेकांना माहीतच नाहीत; अनेक समस्यांवर आहे प्रभावी

2. कडुलिंबाच्या पानांचे फायदे -

भारतातील कडुलिंबाच्या फायद्यांविषयी लहान मुलांना देखील माहिती आहे. त्याचे औषधी गुणधर्म आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत. पाने, देठ, फळे यांसह या झाडाच्या प्रत्येक भागाचा आपल्याला फायदा होऊ शकतो. त्वचारोग, ताप, दातदुखीही कडुनिंबाने बरी होते. मधुमेहामध्ये जर रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात नसेल तर रोज सकाळी कडुनिंबाची पाने चघळायला सुरुवात करावी. याशिवाय त्याचा रस काढून प्यायल्यास ते मधुमेहावर अधिक गुणकारी ठरते.

हे वाचा - Summer Health: उन्हाळ्यात डिहायड्रेशनचे कारण ठरतात या 5 गोष्टी; आजपासूनच खाताना काळजी घ्या

(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

First published:
top videos

    Tags: Diabetes, Health Tips