मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /...अन् क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं; झोपण्याआधी केलेली छोटीशी चूक बेतली 8 जणांच्या जीवावर

...अन् क्षणात संपूर्ण कुटुंब संपलं; झोपण्याआधी केलेली छोटीशी चूक बेतली 8 जणांच्या जीवावर

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

प्रतीकात्मक फोटो (सौजन्य - Canva)

रात्री झोपण्यापूर्वी केलेली एक चूक आणि होत्याचं नव्हतं झालं.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Delhi, India

पॅरिस, 08 फेब्रुवारी : बऱ्याचदा नकळत आपल्याकडून किती तरी चुका होतात. काही वेळा या चुकांचे परिणाम दिसून येत नाही. पण काही वेळा त्यांचे भयंकर परिणाम समोर येतात. अशीच एक घटना घडली आहे. ज्यात एक छोटीशी चूक कुटुंबाच्या जीवावर बेतली आहे. संपूर्ण कुटुंब संपलं आहे. फ्रान्सच्या पॅरिसमधील ही धक्कादायक घटना आहे.

चार्ली-सूर-मार्ने शहारातील एका घरात मध्यरात्री अचानक आग लागली. पाहतात पाहता घर आगीच्या विळख्यात सापडलं. एकाच कुटुंबातील आठही जणांचा मृत्यू झाला. महिला आणि तिची 7 मुलं जिवंत जळाली. सुदैवाने या महिलेचा नवरा मात्र जिवंत राहिला. तो चमत्कारिक पद्धतीने बचावला खरा पण गंभीररित्या भाजला आहे.

हे वाचा - धरतीवरील संकटाचे आकाशात मिळाले होते संकेत; Turkey Earthquake आधीचा 'तो' Video Viral

रिपोर्टनुसार 80 अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित ही आग विझवण्याचे अतोनात प्रयत्न केले. पण घराच्या वरच्या मजल्यावर अडकलेली आई आणि तिच्या मुलांना वाचवता आलं नाही.  अग्निशमन दलाचे अधिकारी जीन क्लाऊड ओगुएल यांनी सांगितलं की, घर पूर्णपणे जळू राख झालं होतं. फक्त भिंतीच शिल्लक होत्या. फक्त महिलेचा पती बचावला आहे.

पोलिसांच्या अंदाजानुसार जेव्हा घरात धूर पसरला तेव्हा ही व्यक्ती ते तपासण्यासाठी खाली आली असावी आणि तिने आपल्या बायकोला आणि मुलांना सुरक्षेसाठी म्हणून वरच राहायला सांगितलं असेल.

प्राथमिक तपासात वॉशिंग मशीनमुळे ही आग लागली असल्याचं सांगितलं जातं आहे. कुटुंबाने रात्री मिळणाऱ्या स्वस्त विजेच्या नादात वॉशिंग मशीन चालूच ठेवली आणि ते झोपले. ज्यामुळे शॉर्ट सर्किट झालं आणि आग लागून इतकी मोठी दुर्घटना घडली. दरम्यान याबाबत अद्याप अधिकृतरित्या पुष्टी झालेली नाही. या प्रकरणाचा तपास अद्याप सुरू आहे.

हे वाचा - 22 वेळा तिने...; बेडरूममध्ये Girlfriend च्या 'त्या' कृत्यामुळे सीरिअल किलर Boyfriend चा गेला जीव

तुम्हीही असा निष्काळजीपणा करत असाल तर तो तुमच्याही जीवावर बेतू शकतो. त्यामुळे या कुटुंबाने जी चूक केली ती तुम्ही करू नका.

First published:

Tags: Fire, France, World news