अंकारा, 08 फेब्रुवारी : तुर्की-सीरियासह 4 देशांमध्ये भूकंपामुळे प्रचंड विध्वंस झाला आहे. हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे, तर कित्येक लोक जखमी झाले आहेत. जे भूकंपातून बचावले त्यांची अवस्थाही भयंकर आहे. भूकंपानंतर तुर्कस्तानातील बरेच व्हिडीओ व्हायरल होत आहेत. ज्यातील या व्हिडीओनेही सर्वांचं लक्ष वेधलं आहे. हा व्हिडीओ तुर्कस्तानातील भूकंपाआधीचा असल्याचा दावा केला जातो आहे. ज्यात धरतीवरील संकटाचे संकेत आकाशात मिळाले होते.
जिओपॉलिटिक्स सिक्युरिटीशी ंसंबधित @OsintTV ने ट्विट केलेला हा व्हिडीओ उद्योपती आनंद महिंद्रा आणि आयएफएस अधिकारी सुशांत नंदा यांनीही शेअर केला आहे. भूकंपआधी निसर्गाने अलर्ट दिला होता. पण हा अलर्ट माणसांना ओळखता आला नाही, असं सांगितलं जातं आहे. नेमका हा अलर्ट काय होता पाहुयात.
हे वाचा - वेळेला धावून येतो तोच.. भारतीयांच्या मदतीने तुर्की नागरीक भारावले; पाहा कसे मानले आभार?
व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता आकाशात पक्ष्यांचा थवा दिसतो आहे. पक्षी शहरावर घिरट्या घालताना आणि मोठमोठ्याने ओरडताना दिसत आहेत. जणू त्यांना कसली तरी चाहूल लागली आणि ते सर्वांना सांगत आहेत. व्हिडीओ पाहिल्यानंतर तो रात्रीचा असावा असं दिसतं आहे. @OsintTV ने दावा केला आहे की हा व्हिडिओ तुर्कीमध्ये झालेल्या विनाशकारी भूकंपाच्या काही काळापूर्वीचा आहे. व्हिडिओसोबतच्या कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, तुर्कस्तानमध्ये भूकंपाच्या आधी पक्ष्यांमध्ये विचित्र वर्तन दिसले. या आपत्तीची माहिती पक्ष्यांना लागल्याने त्यांनी सावधही केल्याचे बोलले जात आहे.
आयएफएस परवीन कासवान आणि आनंद महिंद्रा यांनी हा व्हिडीओ शेअर करत याला निसर्गाची पूर्व चेतावणी प्रणाली म्हटलं आहे. कदाचित आपल्याला ते कसे वापरायचे हेदेखील माहित नाही.
हे वाचा - तुर्की आणि सीरियामध्ये मृत्यूतांडव, मृतांचा आकडा 7726 वर, 3 महिने आणीबाणी लागू
या व्हिडीओवर बऱ्याच कमेंट येत आहेत. आमच्या धार्मिक पुस्तकांमध्येही पक्षी आणि इतर प्राण्यांना आपत्तींबद्दल आधी माहिती मिळते असा उल्लेख आहे, असं काही युझर्सनी म्हटलं आहे.
Nature’s alarm system. We are not sufficiently tuned in to nature to hear it… https://t.co/jzjkQxCxsR
— anand mahindra (@anandmahindra) February 6, 2023
याआधी नेदरलँडचे वैज्ञानिक फ्रेंक होगरबीट्स यांनीही 3 फेब्रुवारीला ट्वीटर केलं होतं. ज्यात त्यांनी भूकंपाबाबत भविष्यवाणी केली होती. साउथ सेंट्रल तुर्की, जॉर्डन, सीरिया आणि लेबनान मध्ये 7.5 तीव्रतेचा भूकंप येऊ शकतो, असं ते म्हणाले होते. त्यांची भविष्यवाणी री ठरली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Earthquake, Turkey, Viral, Viral videos, World news