Home /News /lifestyle /

2 वर्षे ज्या झाडाला घातलं पाणी; त्याच्याबाबत असं काही समजलं की महिलेला बसला शॉक

2 वर्षे ज्या झाडाला घातलं पाणी; त्याच्याबाबत असं काही समजलं की महिलेला बसला शॉक

या झाडात महिलेचा जीव गुंतला होता.

    वॉशिंग्टन, 27 जून : अनेकांना झाडं (tree) लावण्याचा छंद असतो. किंबहुना कित्येकांचा त्या झाडावर इतकं प्रेम असतं की त्यांच्या जीव त्यामध्येच अडकलेला असतो. त्या झाडांना काही झालं तरी त्यांचा जीव तुटतो. असंच काहीसं झालं आहे ते अमेरिकेतल्या एका महिलेसह. एक-दोन महिने नव्हे तर दोन वर्ष या महिलेनं ज्या झा़डाला पाणी घातलं. त्या झाडाबाबत तिला असं काही समजलं की तिला धक्काच बसला.कॅली चॅपमॅन असं या महिलेचं नाव आहे. तिच्याकडे खूप सुंदर झाड होतं, ज्याची ती दोन वर्षांपासून खूप काळजी घेत होती. मात्र नंतर तिला समजलं की आपण ज्या झाडाची इतकी काळजी घेत होतो, ते खरंतर फेक आहे, प्लास्टिकचं झाड आहे आणि या झाडात ती इतकी गुंतली होती की तिच्यासाठी हा मोठा धक्का होता. तिनं आपला हा अनुभव फेसबुकवर शेअर केला. कॅली म्हणाली, "गेली दोन वर्ष माझ्याकडे हे झाड होतं, मला खूप आवडत होतं. या हिरव्यागार झाडाला मी माझ्या किचनच्या खिडकीवर ठेवलं होतं. त्याला दररोज पाणी घालायचे. माझ्याशिवाय तर त्याला कुणी दुसऱ्याने पाणी घातलं तर मी त्या व्यक्तीवर भडकायचे. या झाडाला मी जवळपास दोन वर्ष पाणी घातलं. त्याच्या पानांवरही कधी धूळ बसू दिली नाही इतकी काळजी घेतली" हे वाचा - खारीनं खाताना असा काढला आवाज, 70 हजारहून अधिकवेळा पाहिला गेलाय 'हा' VIDEO "त्यानंतर त्याच्यासाठी एक सुंदर कुंडी आणली आणि जेव्हा नव्या कुंडीत लावण्यासाठी जुन्या कुंडीतून मी हे झाड काढलं तेव्हा पाहतच राहिले. कारण ते झाड नकली होतं, प्लास्टिकचं होतं आणि मला समजलंही नाही", असं कॅलीने सांगितलं. हे वाचा - उंदीर-मांजराची जमली गट्टी; रिअल लाइफमधील TOM & JERRY चा व्हिडीओ व्हायरल कॅलीची ही पोस्ट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाली. ज्यावर युझर्सनीही बऱ्याच प्रतिक्रिया दिल्यात. कुणी तिची मस्करी केली, कुणी तिला मूर्ख ठरवलं, तर कुणी असं कुणासोबतही होऊ शकतं, असं म्हणत तिचं सांत्वन केलं. संपादन - प्रिया लाड
    First published:

    Tags: Lifestyle, Plants, Tree

    पुढील बातम्या