मुंबई, 24 जून : टॉम अँड जेरी (TOM & JERRY) हे कार्टुन आपणा सर्वांनाच आवडतो. आजही जरी आपण मोठे झालो तरी हे कार्टुन पाहण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. अगदी सोशल मीडियावरही त्याचे व्हिडीओ दिसले की आपण हमखास पाहतोच. उंदीर आणि मांजर (RAT AND CAT) तसे शत्रू जे एकमेकांसह कधीच राहू शकत नाहीत हे आपल्याला माहिती आहे. मात्र टॉम अँड जेरी कार्टुनने मात्र या कट्टर शत्रूंमध्ये मैत्री घडवून आणली. मस्ती, चिडवाचिडवी करत या दोघांमध्येही मैत्री होऊन ते एकत्र राहू शकतात हे आपण या कार्टुनमध्ये पाहिलं. हेच टॉम अँड जेरी आता रिअल लाइफमध्येही दिसून आलेत. उंदीर आणि मांजराचा एक टिकटॉक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. ज्यामध्ये उंदीर पुढे आणि मांजर मागे चालत आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो. मांजर उंदराला पकडण्याचा किंवा त्याला हानी पोहोचवण्याचा अजिबात प्रयत्न करत नाही. जसजसा तो पुढे जातो तसतशी तीदेखील त्याच्यामागे जाते. दोघंही एकत्र रस्ता ओलांडताना दिसतात.
हे वाचा - कोरोनानं केलं लखपती! क्वारंटाइनमध्ये TikTok व्हिडीओ बनवून ‘हा’ तरूण झाला स्टार हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेक नेटिझन्सनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. रिल लाइफमधील टॉम अँड जेरीची मैत्री रिअल लाइफमध्येही खरी होत असल्याचं दिसत आहे.
— Holly Jolly Bony Xcribe ☠️🖤🎄 (@bonyscribe) June 22, 2020
एका ट्विटर युझर्सने अशीच काहीशी प्रतिक्रिया या व्हिडीओवर दिली आहे. कार्टुनमधील टॉम अँड जेरीचा मैत्रीचा हात मिळवतानाचा व्हिडीओ शेअर केला.
Surely, that is not a mouse.
— I blame Rupert Murdoch for all of this (@EverSnide) June 22, 2020
काही ट्विटर युझर्सनी हा उंदीर आहे की नाही यावर शंका घेतली आहे. नक्कीच हा उंदीर नसावा, असं म्हटलं आहे.
Just a cat walking the family rat, nothing to see here....
— Hawkeye💥Kate Bishop🌻 (@NotYrKateBishop) June 22, 2020
And now I'm wondering if you could teach them to do that.
तर एका युझरने आपली मांजरदेखील असंच वागत असल्याचं म्हटलं आहे. मात्र जेव्हा उंदीर रागाने तिच्याकडे वळला तेव्हा मात्र ती घाबरून घरी आल्याचं त्याने सांगितलं. संपादन - प्रिया लाड